राजस्‍थानमध्‍ये भीषण अपघात : कारमधील ७ जणांचा होरपळून मृत्‍यू

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजस्‍थानमध्‍ये आज ( दि.१४ एप्रिल) सीकर जिल्ह्यात झालेल्‍या भीषण अपघातात कारमधील दोन मुले, तीन महिलांसह सात जणांचा होरपळून मृत्‍यू झाला. ही दुर्घटना फतेहपूर शेखावती येथील आशीर्वाद चौकाजवळील पुलावर घडली. पोलिस उपअधीक्षक (फतेहपूर सर्कल) रामप्रताप बिश्नोई यांनी सांगितले की,फतेहपूर शेखावती येथील आशीर्वाद चौकाजवळील पुलावर कारने पाठीमागून ट्रकला धडक दिली. अपघातानंतर कारने पेट … The post राजस्‍थानमध्‍ये भीषण अपघात : कारमधील ७ जणांचा होरपळून मृत्‍यू appeared first on पुढारी.

राजस्‍थानमध्‍ये भीषण अपघात : कारमधील ७ जणांचा होरपळून मृत्‍यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : राजस्‍थानमध्‍ये आज ( दि.१४ एप्रिल) सीकर जिल्ह्यात झालेल्‍या भीषण अपघातात कारमधील दोन मुले, तीन महिलांसह सात जणांचा होरपळून मृत्‍यू झाला. ही दुर्घटना फतेहपूर शेखावती येथील आशीर्वाद चौकाजवळील पुलावर घडली.
पोलिस उपअधीक्षक (फतेहपूर सर्कल) रामप्रताप बिश्नोई यांनी सांगितले की,फतेहपूर शेखावती येथील आशीर्वाद चौकाजवळील पुलावर कारने पाठीमागून ट्रकला धडक दिली. अपघातानंतर कारने पेट घेतला ही आग एवढी भीषण होती की काही वेळातच आगीने कारला कवेत घेतले. कारमधील लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.कारमधील सर्व लोक मेरठ, उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. सालासर बालाजी मंदिराकडून हिसारकडे जात होते.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. कारमधील मृत प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नाही.
हेही वाचा : 

माेठी बातमी : सरबजीत सिंग यांच्‍या मारेकर्‍याची पाकिस्‍तानात गोळ्या झाडून हत्या
Israel-Iran War : “… त्‍यांना किंमत मोजावी लागेल” : इस्‍त्रायलचा इराणला इशारा
Indonesia landslide: इंडोनेशियात मोठी दुर्घटना; भूस्खलनात १४ जणांचा मृत्यू

Latest Marathi News राजस्‍थानमध्‍ये भीषण अपघात : कारमधील ७ जणांचा होरपळून मृत्‍यू Brought to You By : Bharat Live News Media.