बाबासाहेबांचे संविधान वाचवणे हाच आमचा उद्देश: मल्लिकार्जुन खरगे

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन करण्यासाठी मी पवित्र दीक्षाभूमी येथे आलो आहे. डॉ बाबासाहेबांचे संविधान वाचवणे हाच आमचा उद्देश असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. संसदेमध्ये सकाळीच मी जयंती साजरी करून थेट नागपूरमध्ये आलोय. ही बाबासाहेबांची कर्मभूमी आहे आणि बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं आहे. त्याच वाटेवर सर्व … The post बाबासाहेबांचे संविधान वाचवणे हाच आमचा उद्देश: मल्लिकार्जुन खरगे appeared first on पुढारी.

बाबासाहेबांचे संविधान वाचवणे हाच आमचा उद्देश: मल्लिकार्जुन खरगे

नागपूर: Bharat Live News Media वृत्तसेवा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन करण्यासाठी मी पवित्र दीक्षाभूमी येथे आलो आहे. डॉ बाबासाहेबांचे संविधान वाचवणे हाच आमचा उद्देश असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. संसदेमध्ये सकाळीच मी जयंती साजरी करून थेट नागपूरमध्ये आलोय. ही बाबासाहेबांची कर्मभूमी आहे आणि बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं आहे. त्याच वाटेवर सर्व लोक चालावेत हीच आमची अपेक्षा आहे असे दीक्षाभूमीला अभिवादन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. Mallikarjun Kharge
बाबासाहेबांच्या संविधानाला वाचवणं आणि लोकशाहीला वाचवणं हाच आमचा उद्देश आहे. यामुळे देशातील सामान्य लोकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळेल. संविधान वाचवण्यासाठी आम्ही लढत आहोत आणि लढत राहू असे खर्गे म्हणाले. Mallikarjun Kharge
भाजपा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे यासंदर्भात छेडले असता ही चर्चा करण्याची ही जागा नाही.या स्थळाला मी धार्मिक स्थळ मानतो, त्यामुळे या विषयावर मी पब्लिक मीटिंगमध्ये त्यांचा जाहीरनामा आणि आमचा जाहीरनामा यासंदर्भात सविस्तर बोलेन असेही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते नागपुरातील गोळीबार चौक येथे नागपूरचे लोकसभा उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेसाठी खर्गे आले आहेत.
हेही वाचा 

नागपूर विमानतळावर रनवेचे दिवे बंद, अनेक विमाने खोळंबली, प्रवासी संतप्त !
नागपूर : नवनीत राणा यांचे प्रचार कार्यालय वादळी पावसाने जमीनदोस्त
नागपूर : कोराडी देवी मंदिरातील कर्मचाऱ्यांना फराळाच्या पदार्थातून विषबाधा

Latest Marathi News बाबासाहेबांचे संविधान वाचवणे हाच आमचा उद्देश: मल्लिकार्जुन खरगे Brought to You By : Bharat Live News Media.