IPL 2024 : लखनौला दोन धक्के, डी कॉक पाठोपाठ हुडाही तंबूत परतला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज 28 व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) लखनऊ सुपरजायंट्सचा आमने-सामने आहेत. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. कोलकाता आणि लखनौ या दोन्ही संघांना मागील सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे
लखनऊ सुपरजायंट्सचा सलामीवीर क्विंटन डी कॉक बाद झाला. कोलकाताचा गोलंदाज वैभव अरोरा याने डी कॉकला बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. डी कॉक आठ चेंडूत १० धावा करून बाद झाला. यानंतर दीपक हुडा मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. हुडा १० चेंडूत आठ धावा करून बाद झाला.
कोलकाता नाइट रायडर्स : फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती. इम्पॅक्ट सब: सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग.
लखनौ सुपरजायंट्स: क्विंटन डी कॉक, केएल राहुल (यष्टीरक्षक, कर्णधार), दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, शामर जोसेफ, यश ठाकूर. इम्पॅक्ट सब: अर्शद खान, प्रेरक मांकड, एम सिद्धार्थ, अमित मिश्रा, के. गौतम.
Latest Marathi News IPL 2024 : लखनौला दोन धक्के, डी कॉक पाठोपाठ हुडाही तंबूत परतला Brought to You By : Bharat Live News Media.
