वयाच्या ३१ व्या वर्षी मुलीची १२ कोटींची बचत

लॉस एंजेलिसः प्रत्येक व्यक्तीची आयुष्य जगताना काही स्वप्नं असतात आणि ही स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी प्रत्येक जण अथक प्रयत्न करत असतो. आपलं मोठं घर असावं, चांगली नोकरी असावी, बायको-मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चांगला पगार हवा, असं प्रत्येकाला वाटतं. भविष्यासाठीही प्रत्येकजण पैशाची बचत करत असतो. आपल्याला लाखो रुपये सेव्ह करण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लोटावा लागतो; पण अमेरिकेत एक अशी मुलगी आहे, जिने वयाच्या 31 व्या वर्षी 12 कोटी रुपयांचं सेव्हिंग केलं आहे. इतक्या पैशांत ती तिचं पुढचं आयुष्य आरामात काढू शकते आणि म्हणूनच ती केवळ 35 वर्षांपर्यंतच काम करून पुढे रिटायरमेंट घेणार आहे.
द सन वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहणार्या या तरुणीचं नाव कॅटी असं आहे. कॅटीचं इन्स्टाग्रामवर ‘मिलेनिअल मनी हनी’ नावाने अकाऊंट आहे, ज्यावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. ती या अकाऊंटवर पैशाची बचत कशी करावी? याच्या टिप्स सांगत असते. जेव्हा कॅटी 20 वर्षांची होती, तेव्हा ती इतर तरुण मुलींप्रमाणेच पार्टी करण्याचे, मौजमज्जा करण्याचे विचार करायची. तिला आरामदायी आयुष्य जगण्यासाठी पैसे खर्च करणं आवडायचं.
पण, जसजशी ती मोठी होत गेली तसतसे तिला बचतीचे फायदे समजले आणि ती पैसे वाचवून स्वत:चं भविष्य चांगलं बनवू शकते हे तिला समजलं आणि तिने सेव्हिंगला सुरुवात केली. कॅटीने 26 वर्षांच्या वयात पैशांची बचत करायला सुरुवात केली. तिला ‘फायर’ म्हणजेच ‘फायनान्शियल इंडिपेंडन्स रिटायर अर्ली’ बद्दल माहिती मिळाली. कॅटीला तिचा वार्षिक खर्च 30 लाखांपर्यंत होत असल्याचं समजलं, तिने हे सर्व पैसे सेव्ह केले आणि ‘फायर’ या प्लॅनद्वारे ही अमाऊंट दुप्पट केली. कॅटीने असं करत वयाच्या 31 व्या वर्षी 12 कोटी रुपयांचा टप्पा गाठला.
Latest Marathi News वयाच्या ३१ व्या वर्षी मुलीची १२ कोटींची बचत Brought to You By : Bharat Live News Media.
