गंगापूरमध्ये उद्या कुस्त्यांची दंगल; कुस्ती स्पर्धेचा थरार अनुभवा

नाशिक : सातपूर, शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी मित्रमंडळ या संस्थेच्या माध्यमातून सालाबादाप्रमाणे यंदाही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सोमवारी (दि. १५) सायं. ४ वाजता गंगापूर शिवारातील जगदगुरू संत तुकाराम महाराज येथे कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या ३५ वर्षांपासून ही दंगल आयोजित केली जात असून, यंदाही या ठिकाणी महाराष्ट्रासह देशभरातील नामवंत मल्ल व मोठ्या प्रमाणात कुस्तीप्रेमी उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी येथील कुस्त्यांची दंगल बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात नाशिककर येत असतात. यंदा नामवंत मल्ल या दंगलीत सहभागी होणार असल्याने, कुस्तीप्रेमींनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे संस्थापक दिनकर पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा:
Zombie Drug : झोंबी ड्रग्जसाठी कबरी उकरु लागले लोक; अखेर ‘या’ देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित
चंद्राभोवती फिरत आहे उडती तबकडी?
‘हेल प्लॅनेट’वर इंद्रधनुष्य?
Latest Marathi News गंगापूरमध्ये उद्या कुस्त्यांची दंगल; कुस्ती स्पर्धेचा थरार अनुभवा Brought to You By : Bharat Live News Media.
