छ.संभाजीनगर : अज्ञात वाहनाच्या धडकेत शिवणावाडीतील दुचाकीस्वार जागीच ठार
पिंपळदरी; पुढारी वृत्तसेवा : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी रोडवर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी घडली. आकाश रामदास पाडळे (वय 25, रा. शिवणावाडी) असे मृताचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, आकाश पाडळे शिवणावाडी येथील शेतीमध्ये गव्हाला पाणी देऊन पिंपळदरी वाडा येथे दुचाकीवरून परत येत होता. यावेळी पिंपळदरी येथील अजिंठा लेणी व्ह्यू पॉइंट रोडवर अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक देऊन पसार झाला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
आकाश पाडळे हा जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमध्ये सिक्युरिटीमध्ये काम करत होता. अजिंठा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. पुढील तपास प्रमोद भिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद वाघुले, भागवत शेळके करीत आहे.
हेही वाचा
छ. संभाजीनगर : पोलीस बंदोबस्तात नाथसागर धरणात पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला पाणी सोडू नका; पाटबंधारेच्या पत्रानंतर मराठा समाज आक्रमक
छत्रपती संभाजीनगर : चोरट्याने एटीएम फोडले, पैसे घेऊन पळणार तेवढ्यात पोलीस आले
The post छ.संभाजीनगर : अज्ञात वाहनाच्या धडकेत शिवणावाडीतील दुचाकीस्वार जागीच ठार appeared first on पुढारी.
पिंपळदरी; पुढारी वृत्तसेवा : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी रोडवर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी घडली. आकाश रामदास पाडळे (वय 25, रा. शिवणावाडी) असे मृताचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, आकाश पाडळे शिवणावाडी येथील शेतीमध्ये गव्हाला पाणी देऊन पिंपळदरी वाडा येथे दुचाकीवरून परत येत होता. यावेळी पिंपळदरी येथील अजिंठा …
The post छ.संभाजीनगर : अज्ञात वाहनाच्या धडकेत शिवणावाडीतील दुचाकीस्वार जागीच ठार appeared first on पुढारी.