आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

  चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल. मेष : आजचा दिवस कुटुंब आणि नातेवाईकांसोबत आनंदात जाईल. मित्रांसोबतची भेट लाभदायक ठरेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदलासाठी … The post आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? appeared first on पुढारी.

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला :

 
चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : आजचा दिवस कुटुंब आणि नातेवाईकांसोबत आनंदात जाईल. मित्रांसोबतची भेट लाभदायक ठरेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदलासाठी कुटुंबातून प्रोत्साहन मिळू शकेल. अनोळखी व्यक्तीबरोबर काम करण्यापूर्वी माहिती घेवूनच निर्णय घ्‍या. निष्काळजीपणाने तुमची फसवणूक होऊ शकते. व्यावसायिक कार्यात कोणताही बदल करू नका. पती-पत्नीमध्‍ये सहकार्य राहिल. आरोग्य चांगले राहील.
वृषभ : प्रभावी बोलण्याने तुमचा इतरांवर प्रभाव राहिल. घरात एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. वादविवाद टाळा. तुमच्यातील गुणांचा सकारात्मक पद्धतीने वापर करा. आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कुटुंबातील सदस्यांसोबत मनोरंजनासाठी वेळ व्‍यतित कराल. मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनी काळजी घ्‍यावी.
मिथुन : आज तुम्ही पैशाशी संबंधित केलेल्‍या नियोजन यशस्वी होईल. कौटुंबिक सुखसोयींवरही खर्च होईल. धार्मिक कार्यक्रमात जाण्याची संधी मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक. घरातील एखाद्याच्या तब्येतीची चिंता राहील. व्यवसायाला अंतर्गत सुधारणेकडे लक्ष द्‍या. जोडीदाराच्या नाराजीचा सामना करावा लागेल. आरोग्य चांगले राहील.
कर्क : श्रीगणेश म्‍हणतात की, आज गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल. खर्चा वाढला तरी उत्पन्नाचे साधनही असेल. त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. कौटुंबिक आणि सामाजिक कार्यात थोडा वेळ घालवा. आत्मकेंद्रितपणामुळे नाते बिघडू शकते. कार्यक्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तीचे योगदान तुम्हाला व्यवसायात यश मिळवून देऊ शकते. पती-पत्नीच्या नात्यात लहानसहान गोष्टीवरून वाद होऊ शकतो. शरीरिक तक्रारीकडे दुर्लक्ष करु नका.
सिंह : श्रीगणेश म्हणतात की, आज तुमची अचानक एखादी अनोळखी व्यक्ती भेटेल आणि ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर असेल. मालमत्ता विकण्याची योजना असल्यास, त्यावर लक्ष केंद्रित करा. वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. न्यायालयीन प्रकरणाचाही आता गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या, आज मार्केटिंग आणि मीडियाशी संबंधित सर्व कामे व्यवस्थित पूर्ण होतील. पती-पत्नीच्या नात्यात गोड वाद होऊ शकतो. अंगदुखी आणि थकवा जाणवू शकतो.
कन्या : आज तुम्‍ही तुमच्या कामाप्रती पूर्णपणे समर्पित राहाल, असे श्रीगणेश सांगतात. ग्रहस्थिती अनुकूल आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या. नकारात्मक विचार टाळून सकारात्‍मक लोकांसोबत वेळ व्‍यतित करा. थोडावेळ आत्मनिरीक्षणात घालवा. व्यावसायिक कामांकडे पूर्ण लक्ष द्या. कौटुंबिक आणि व्यवसायात सामंजस्यामुळ दिलासा मिळेल. आरोग्य उत्तम राहील.
तूळ : आज जास्तीत जास्त वेळ सामाजिक आणि राजकीय कार्यात व्यतीत होईल. मुलाच्या करिअरशी संबंधित समस्या सोडवण्‍यास यश मिळू शकते. घरातील ज्‍येष्‍ठांचे स्नेह लाभेल, असे श्रीगणेश सांगतात. चिडचिडेपणाचा परिणाम कामगिरीवरही होऊ शकतो. प्रवासाचे नियोजन करु नका. आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल.
वृश्चिक : श्रीगणेश म्‍हणतात की, दिनचर्येतील काही बदलांचे नियोजन कराल. त्यामुळे तुमची कार्यक्षमतेमध्‍ये वाढ होईल. धर्म आणि कर्माशी संबंधित बाबींमध्येही तुम्ही हातभार लावाल. वारसाहक्काशी संबंधित वाद वाढू शकतो. आर्थिक व्‍यवहार करताना काळजीपूर्वक विचार करा.रागावरही नियंत्रण ठेवा. जोडीदाराचा भावनिक पाठिंबा मिळेल. आरोग्‍य चांगले राहिल.
धनु : आज बहुतांश कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा तुमचा प्रयत्न असेल. तुमच्‍या व्‍यक्‍तिमत्त्‍वामुळे लोक प्रभावित होतील. काही कामांमध्‍ये व्यत्यय येवू शकतो. मात्र तुम्‍ही परिश्रमाच्‍या जोरावर यशस्वी व्हाल. घसादुखीचा त्रास होवू शकतो.
मकर : आज धार्मिक कार्यातील सहभागामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल, असे श्रीगणेश म्हणतात. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीशी संबंधित योजना असतील तर कागदपत्रांबाबत जास्त काळजी घ्या. एक छोटीशी चूक मोठी समस्या निर्माण करू शकते. व्यवसायिक कामे सामान्य राहतील. पती-पत्नीचे नाते आनंदी राहू शकते. आरोग्य उत्तम राहिल.
कुंभ : श्रीगणेश म्हणतात की, आज अनकूल ग्रहमानामुळे सर्व कामे व्यवस्थित पूर्ण होतील. तुम्हाला अचानक आंतरिक शांतीचा अनुभव येऊ शकतो. नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी संबंधात अधिक सुधारणा होईल. उत्पन्नाच्या साधनांमध्ये किंचित घट होऊ शकते. व्यावसायिक घडामोडींवर पूर्ण लक्ष देणे खूप महत्वाचे ठरेल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. बदलत्‍या हवामानामुळे अंगदुखी आणि सौम्य तापाची तक्रार जाणवू शकते.
मीन : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही प्रत्येक काम व्यावहारिक पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. मित्र आणि नातेवाईक देखील तुमच्या बुद्धिमत्तेचा आदर करतील. संततीच्या बाजूने कोणतेही समाधानकारक परिणाम मिळाल्याने घरात उत्सवाचे वातावरण असेल. राग, हट्टीपणा स्वभावात येऊ देऊ नका. यामुळे अनेक कामे रखडतील. तुमचा व्यावहारिक दृष्टिकोन तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक समस्या सोडवण्यास सक्षम करेल. पती-पत्नीमध्ये काही वाद होऊ शकतात. प्रकृती चांगली राहिल.
Latest Marathi News आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? Brought to You By : Bharat Live News Media.