गाफील राहू नका, एकजुटीने काम करा : मुख्यमंत्री

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महायुतीचे सरकार आल्यापासून गेल्या दीड-पावणेदोन वर्षात अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. हे सर्वसामान्यांचे सरकार असून त्यांच्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. हे निर्णय आणि योजना जनतेपर्यंत पोहोचवा. आत्मविश्वास बाळगा. पण गाफील राहू नका. एकदिलाने काम करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या शिंदे यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शनिवारी … The post गाफील राहू नका, एकजुटीने काम करा : मुख्यमंत्री appeared first on पुढारी.

गाफील राहू नका, एकजुटीने काम करा : मुख्यमंत्री

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : महायुतीचे सरकार आल्यापासून गेल्या दीड-पावणेदोन वर्षात अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. हे सर्वसामान्यांचे सरकार असून त्यांच्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. हे निर्णय आणि योजना जनतेपर्यंत पोहोचवा. आत्मविश्वास बाळगा. पण गाफील राहू नका. एकदिलाने काम करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या शिंदे यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शनिवारी सायंकाळी मेळावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच जगात भारताचे स्थान आदराचे झाले आहे. म्हणून आज भारत बोलतो आणि जग ऐकत आहे. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रसेवेसाठी जीवन समर्पित केले आहे. त्यामुळेच भारताची वाटचाल आर्थिक महासत्तेकडे होत आहे. विकासाच्या बाबतीत ब्रिटिश राजवटीलाही मागे टाकण्याचे काम मोदी यांनी केले आहे.
इंडिया आघाडीला चारीमुंड्या चीत करण्यासाठी निवडणूक
शिंदे म्हणाले, ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे, प्रगतीची आहे आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याची आहे. 60 वर्षे देश मागे नेणार्‍या इंडिया आघाडीला चारीमुंड्या चीत करण्यासाठी ही निवडणूक आहे. त्यामुळे जागरूक राहा आणि महायुतीला विजयी करा, धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत आणि महायुतीला मत म्हणजे मोदींना मत, असेही शिंदे म्हणाले.
महाराष्ट्रात 8 लाख कोटींची परकीय गुंतवणूक
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, यापूर्वीच्या राज्य सरकारच्या कालावधीत सर्व कामकाज ठप्प होते. अहंकाराने सर्व काही बंद केले जात होते. जलशिवार योजना, मेट्रो प्रकल्प आदीसह सर्व प्रकल्प बासनात गुंडाळले होते. इगोसाठी राज्य अधोगतीच्या दिशेने नेले जात होते. सण-उत्सवावर बंदी घातली होती. परंतु महायुतीचे म्हणजे आपले सरकार आले आणि सर्व निर्बंध उठवले. महाराष्ट्रात तब्बल 8 लाख कोटींची गुंतवणूक आली आहे. पूर्वीच्या सरकारच्या कालावधीत सर्व झाले की आमचे काय, अशी विचारणा केली जात होती. त्यामुळे परकीय गुंतवणूक आली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
कोल्हापूरचे लोक संवेदनशील
शिंदे म्हणाले, कोल्हापूरचे लोक संवेदनशील आहेत. 2021 च्या महापुरात आलो असता चिखली परिसराला पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. त्यातही एक वृद्ध दाम्पत्य टेरेसवर जनावरांना घेऊन राहात होते. कोल्हापूरचे लोक इतके प्रेमळ आहेत की, ते जनावरांनाही कुटुंबीय मानतात. मात्र मुंबईत वडिलांना सोडून एक कुटुंब फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायला गेले होते, असा टोला उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. कोल्हापूरला पुन्हा महापुराचा फटका बसू नये म्हणून जागतिक बँकेने 3 हजार 200 कोटींचा प्रकल्प मंजूर केला आहे तसेच कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी काम सुरू झाले आहे.
ताकदवान मंडळी एकत्र असल्याने विजय निश्चित
खा. महाडिक म्हणाले, कोल्हापूर व हातकणंगलेची निवडणूक विजयासाठी सोपी आहे. पण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौर्‍याने मास्टरस्ट्रोक मारला आहे. मुश्रीफ, महाडिक, मंडलिक, समरजित घाटगे, आ. प्रकाश आबिटकर आदी ताकदवान मंडळी असल्याने दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील. विरोधक भावनिक मुद्दा करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. आमचं ठरलंय, कोल्हापूरचं ठरलंय, गादीचा अवमान वगैरे ट्रेंड पाडण्याचा प्रयत्न करतील. पण कार्यकर्त्यांनी त्यांना चोख उत्तर द्यावे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूरला खंडपीठ आणि इचलकरंजीच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही महाडिक यांनी केली.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, महायुतीचे उमेदवार खा. संजय मंडलिक व खा. धैर्यशील माने, माजी खा. निवेदिता माने, माजी आ. अमल महाडिक व चंद्रदीप नरके आदी उपस्थित होते.
Latest Marathi News गाफील राहू नका, एकजुटीने काम करा : मुख्यमंत्री Brought to You By : Bharat Live News Media.