पूर्णेत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभुमीवर पोलीसांचा रुटमार्च

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : आज (१४ एप्रिल २०२४) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पूर्णा शहरात कुठलाही अनूचित प्रकार घडू नये यासाठी शनिवारी (दि. १३) सायंकाळी ६:२० वाजता मिरवणूक मार्गावरुन पोलीस पथकाने रुट मार्च काढला. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ समाधान पाटील,पोनि विलास गोबाडे,सपोनि दर्शन शिंदे,नांदगावकर,रेखा शहारे,पोउनि शिवप्रसाद क-हाळे, सुरजित सिंघ,रामकिशन … The post पूर्णेत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभुमीवर पोलीसांचा रुटमार्च appeared first on पुढारी.

पूर्णेत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभुमीवर पोलीसांचा रुटमार्च

पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा : आज (१४ एप्रिल २०२४) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पूर्णा शहरात कुठलाही अनूचित प्रकार घडू नये यासाठी शनिवारी (दि. १३) सायंकाळी ६:२० वाजता मिरवणूक मार्गावरुन पोलीस पथकाने रुट मार्च काढला.
उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ समाधान पाटील,पोनि विलास गोबाडे,सपोनि दर्शन शिंदे,नांदगावकर,रेखा शहारे,पोउनि शिवप्रसाद क-हाळे, सुरजित सिंघ,रामकिशन चव्हाण सह ८ पोलिस अधिकारी,१४ अंमलदार, राज्य राखीव दलाचे २ अधिकारी, ४५ अंमलदार, २५ होमगार्ड हजर होते यांचा या रुटमार्च पथकात समावेश होता. तसेच यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विलास गोबाडे यांनी ग्राऊंडवर उपस्थित पोलिस कर्मचा-यांचा बेकायदेशिर जमाव नियंत्रीत करण्यासाठी ची दंगा काबू योजना कवायत घेण्यात आली.या आधि देखील रमजान ईदच्या अनूषंगाने पोलीसांचा रुटमार्च हा अक्षरशः पावसात भिजत काढण्यात आला होता.
Latest Marathi News पूर्णेत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभुमीवर पोलीसांचा रुटमार्च Brought to You By : Bharat Live News Media.