उद्या पासून चंद्रपुरात माता महाकालीच्या यात्रेस प्रारंभ; महिनाभर चालणार यात्रा महोत्सव

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माता महाकालीच्या यात्रा महोत्सवाला आज (दि 14 एप्रिल) पासून चंद्रपुरात प्रारंभ होत आहे. महिनाभर ही यात्रा भरणार असून राज्यभरातील भाविक माता महाकालीचे दर्शन घेणारं आहेत. चंद्रपूर शहरात माता महाकालीचे पुरातन मंदिर आहे. तेव्हापासूनच राज्यभरातील भाविक माता महाकालीचे दर्शनाला येतात. चैत्र नवरात्र उत्सवापासून म्हणजे उद्या दिनांक 14 एप्रिल … The post उद्या पासून चंद्रपुरात माता महाकालीच्या यात्रेस प्रारंभ; महिनाभर चालणार यात्रा महोत्सव appeared first on पुढारी.

उद्या पासून चंद्रपुरात माता महाकालीच्या यात्रेस प्रारंभ; महिनाभर चालणार यात्रा महोत्सव

चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माता महाकालीच्या यात्रा महोत्सवाला आज (दि 14 एप्रिल) पासून चंद्रपुरात प्रारंभ होत आहे. महिनाभर ही यात्रा भरणार असून राज्यभरातील भाविक माता महाकालीचे दर्शन घेणारं आहेत.
चंद्रपूर शहरात माता महाकालीचे पुरातन मंदिर आहे. तेव्हापासूनच राज्यभरातील भाविक माता महाकालीचे दर्शनाला येतात. चैत्र नवरात्र उत्सवापासून म्हणजे उद्या दिनांक 14 एप्रिल पासून ही यात्रा महिनाभर चालणार आहे. या उत्सवादरम्यान महाकालीच्या दर्शनास स्थानिक भाविकांसोबतच विदर्भ, मराठवाडयातील भाविक मोठ्या संख्येने चंद्रपूर येथे गर्दी होणार आहे. महिनाभराच्या यात्रा महोत्सवात मोठया प्रमाणावर भाविकांची ये-जा सूरू असते.
राज्यभरातील भाविक महिनाभराच्या कालावधीतील महाकाली यात्रा महोत्सवास मातेचे दर्शन घेणार असल्याने यात्रा महोत्सवात भाविकांची गर्दी वाढणार आहे. सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था तसेच रहदारीस अडथळा निर्माण होवु नये याकरिता १४ एप्रिल ते २३ एप्रिल २०२४ पर्यंत वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. या कालावधीत अंचलेश्वर गेट ते बागला चौक हा मार्ग सायकल खेरीज सर्व वाहनांकरीता बंद राहील. तसेच अंचलेश्वर गेट ते बागला चौक हा मार्ग नो पार्कंग झोन घोषीत करण्यात आला आहे. बागला नगर, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड या यात्रा परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी मोटार सायकल व ऑटोनी शहरात जाण्यासाठी व परत येण्यासाठी भिवापूर-हनुमान खिडकी-दादमहल वार्ड या मार्गचा वापर करावा. चारचाकी वाहनांने शहरात किंवा बाहेर जायचे असल्यास कामगार चौक मार्गे बायपास रोड किंवा लालपेठ कॉलरी – पठाणपुरा गेट- गांधी चौक या मार्गाचा वापर करावा. यात्रेकरीता बाहेरून येणाऱ्या वाहनाकरीता खालीलप्रकारे पार्कीग व्यवस्था करण्यात आली आहे.
नियोजीत वाहनतळांची नांवे
नागपुर मार्गे येणारे वाहन करीता-कोहीनुर तलाव मैदान, बल्लारशा मार्गे येणारे वाहनकरीता महाकाली पोलीस चौकी ते इंजिनिअरींग कॉलेजचे रोडचे बाजुस, बल्लारपुर मार्गे येणारे वाहनकरीता-बाबुपेठ पोलीस चौकी (डिएड कॉलेज) संपुर्ण यात्रा स्पेशल राज्य परीवहन बसेस करीता न्यु इंग्लीश हायस्कुल मैदानावर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्य परिवहन बसेस करीता (विश्राम गृह समोर)
माता महाकालीच्या दर्शनासाठी येणारे महाराष्ट्रातील जिल्हयातील तसेच इतर राज्याबाहेरुन भाविक हे बहुतांशी वेगवेगळ्या प्रवासी वाहनातुन प्रवास करून येत असतात. प्रवासी वाहनाच्या व्यतिरिक्त माल वाहतुक करणाऱ्या वाहनामधुन देखील मोठ्या प्रमाणावर भाविक प्रवास करून येत असतात. देवी महाकालीच्या दर्शनासाठी येतांना बहुतेक भाविक वाहन प्रवासी आसन क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवासी बसवुन धोकादायक परिस्थितीत प्रवास करतात. अशावेळी एखादा दुर्देवी अपघात झाल्यास मोठया प्रमाणावर जिवीत हानी होण्याची शक्यता असते.
देवी महाकालीचे दर्शनास बाहेरून येणाऱ्या सर्व भाविकांची यात्रा सुखरूप व सुरक्षीत पार पाडावी या दृष्टीने चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाचे वतीने सर्व भाविकांना आवाहन करण्यात आले आहे. चंद्रपूर पर्यंतचा प्रवास अधिकृत प्रवासी वाहनातून करावा. मालवाहतुक करणाऱ्या वाहनातुन प्रवास करण्याचे पुर्णतः टाळावे व वाहनांच्या प्रवासी आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवुन प्रवास करू नये. चंद्रपूरला येणारे सर्व भाविक या सुचनांचे पालन करून माता महाकालीचा यात्रा महोत्सव यशस्वी करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Latest Marathi News उद्या पासून चंद्रपुरात माता महाकालीच्या यात्रेस प्रारंभ; महिनाभर चालणार यात्रा महोत्सव Brought to You By : Bharat Live News Media.