
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी जर म्हणत असतील की संविधान बदलणार नाही ही माझी गॅरंटी आहे.तर ज्या भाजपाच्या नेत्यांनी सांगितलं की आमच्या 400 जागा निवडून आल्यावर आम्ही संविधान बदलणार, मोदींनी त्यांना अगोदर पक्षातून बाहेर काढावं असे आवाहन काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. नागपुरात दीक्षाभूमी हे पवित्र स्थळ आहे आणि येथूनच बाबासाहेबांनी जगाला समानतेचा आणि न्यायाचा संदेश दिला. या क्षणी बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरण करून मी जगाला शुभेच्छा देऊ इच्छितो की, या देशात न्याय आणि समानता कायम राहील. मोदी हे जर सांगत असतील की असं काही होणार नाही तर त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर जनता आता भरवसा ठेवायला तयार नाही. उद्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी आल्यावर कन्हैयाकुमार यांनी विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
Latest Marathi News मोदीजींनी ‘त्या’ नेत्यांना पक्षातून काढणार का? : कन्हैया कुमारचा सवाल Brought to You By : Bharat Live News Media.
