वर्धा : आठ दुकाने फोडून एक घरफोडी करणारा अट्टल आरोपी ताब्यात

वर्धा; Bharat Live News Media वृत्तसेवा : मार्केट लाईन मधील आठ दुकाने फोडून एक घरफोडी करणारा अट्टल आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीकडून दोन डीव्हीआरसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी राजा उर्फ मानून रशीद फारुकी (वय 45) रा. हवालदारपुरा यास ताब्यात घेतले. यात देबाशिस सरकार रा. संतीपूर वेस्ट बंगाल हा आरोपी असल्याचं पुढे आले आहे.
मागील काही दिवसापासून वर्ध्यातील मार्केट लाईन मधील दुकाने फोडण्याचा प्रकार सुरू होता. चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता व चोरटे चोरी केल्या नंतर फुटेज मिळु नये म्हणून दुकानातील कॅमेरा चे डीव्हीआर सेट चोरून सोबत घेऊन जात होते. यामुळे त्यांना शोधणे अजून आव्हानात्मक झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने या चोरीस आळा घालण्यासाठी रात्र गस्त व चोरी दरम्यान संशीत ईसमावर पाळत ठेऊन त्यांचे बाबत सविस्तर माहिती मिळवली. विश्वसनीय माहितीवरून राजा याला नागपूर वरून ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार देवाशिस सरकार रा संतीपूर वेस्ट बंगाल याचे सोबत मार्केट लाईन मधील आठ दुकाने व एक घर फोडल्याची कबुली दिली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली साहित्य व सायकल सहित चोरलेला डीव्हीआर तसेच चोरीतील इतर मुद्देमाल हा राजा याच्या घरुन जप्त केला. उर्वरित मुद्देमाल हा देबाशीश सरकार याचे जवळ असल्याची कबुली दिल्यावरून आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही करीता शहर यपोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांचे आदेशान्वये पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, अमोल लगड, नरेंद्र पराशर, अमरदीप पाटिल, नितीन इटकरे, संघसेन कांबळे, मिथून जिचकार, अनुप कावळे, अंकित जिभे यांनी केली.
Latest Marathi News वर्धा : आठ दुकाने फोडून एक घरफोडी करणारा अट्टल आरोपी ताब्यात Brought to You By : Bharat Live News Media.
