डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : बेसुमार वृक्षतोड, पसरत चाललेले काँक्रिटचे जंगल आणि तापमान वाढीमुळे सरपटणारे जीव मानवी वस्तीत शिरण्याच्या घटना वाढत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना कल्याण येथे घडली. पश्चिमेकडील एका हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात साप शिरला. या सापाला पाहताच सर्पमित्र येईपर्यंत रूग्णांसह उपस्थित साऱ्यांची काही काळ भीतीने थरकाप उडाला होता.
कल्याण पश्चिम येथील पौर्णिमा टॉकीजजवळ सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागामध्ये एका कर्मचाऱ्याला ऑक्सिजन सिलेंडरवर हा सापआढळून आला. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी साप शिरल्याची माहिती वॉर फाऊंडेशनला दिली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वॉर फाऊंडेशनचे प्रेम आहेर व अक्षय वेखंडे या दोघांनी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागामध्ये जाऊन कोणत्याही रूग्णाला इजा न पोहोचून देता सापाचा सुखरूप बचाव केला. तेथील ऑक्सिजन सिलेंडरवर बसलेल्या सापाला पकडले. एकीकडे सापाला पकडल्यानंतर अतिदक्षता विभागातील साऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तर दुसरीकडे हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी सापाला पकडल्याचे प्रात्यक्षिक त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये कैद केले.
पकडलेला साप धामण जातीचा बिनविषारी सर्प आहे. त्याच्यापासून मानवाला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. हा साप भक्षाच्या शोधात आला असावा, असा अंदाज सर्पमित्रांनी वर्तवला. हा साप लवकरच वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली निसर्गमुक्त करण्यात येईल, अशी माहिती प्राणीमित्र प्रेम आहेर यांनी दिली.
हेही वाचा :
Ratnagiri News: कणेरी येथे पैशाच्या वादातून सख्ख्या भावाचा खून; ७ महिन्यांनंतर छडा
भंडारा: अड्याळ येथे अपघातात तरुणाचा मृत्यू
Ramiz Raja on Ronaldo : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रमीझ राजा म्हणाला, “रोनाल्डोचा डायट प्लॅन नासा…”
The post डोंबिवली : ‘धक्कादायक’, हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात साप आढळला साप appeared first on पुढारी.
डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : बेसुमार वृक्षतोड, पसरत चाललेले काँक्रिटचे जंगल आणि तापमान वाढीमुळे सरपटणारे जीव मानवी वस्तीत शिरण्याच्या घटना वाढत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना कल्याण येथे घडली. पश्चिमेकडील एका हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात साप शिरला. या सापाला पाहताच सर्पमित्र येईपर्यंत रूग्णांसह उपस्थित साऱ्यांची काही काळ भीतीने थरकाप उडाला होता. कल्याण पश्चिम येथील पौर्णिमा टॉकीजजवळ सिद्धिविनायक …
The post डोंबिवली : ‘धक्कादायक’, हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात साप आढळला साप appeared first on पुढारी.