अपहरण प्रकरणी माजी मंत्री अमरमणी त्रिपाठींना मोठा झटका, मालमत्ता जप्त

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अपहरण प्रकरणी उत्तर प्रदेशचे माजी मंत्री अमरमणी त्रिपाठी यांना आज (दि.१३ एप्रिल) मोठा झटका बसला. प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. नौतनवा शहरातील अमरमणी त्रिपाठी यांच्या निवासस्थानाला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
काय आहे प्रकरण ?
6 डिसेंबर 2001 रोजी व्यापारी धर्मराज मधेशिया यांचा मुलगा राहुल याचे अपहरण करण्यात आले. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी अमरमणीसह नऊ जणांना आरोपी केले होते.
लखनौमधील ज्या घरातून अपहरण झालेले मूल सापडले ते घर तत्कालीन मंत्री अमरमणी यांचे असल्याचा आरोप आहे. अमरमणी विरुद्ध 24 ऑक्टोबर 2011 पासून अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.अमरमनी फरार आहेत. या प्रकरण त्यांनी आत्मसमर्पण केले नाही, त्यामुळे त्यांची मालमत्ता जप्त केली जात आहे.
कवयित्री मधुमिता शुक्लाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले अमरमणी त्रिपाठी आणि त्यांची पत्नी मधुमणी त्रिपाठी यांच्या सुटकेचे आदेश मागील वर्षी उत्तर प्रदेश तुरुंग प्रशासन विभागाने दिले होते. . या दोघांचेही तुरुंगातील वर्तन चांगले असल्याने दोघांची उर्वरित शिक्षा रद्द करण्यात आली होती. राज्यपालांच्या परवानगीने तुरुंग प्रशासनाने या दोघांच्या सुटकेचा आदेश जारी केला होता.
हेही वाचा :
सिडनीची सिंघम : महिला पोलिसाना केला हल्लेखोराच एका गोळीत खातमा; धाडसामुळे वाचले अनेकांचे प्राण
Arvind Kejriwal : केजरीवालांचा तुरुंगात ‘छळ’ केला जातोय; आप नेते संजय सिंह यांचा दावा
Elon Musk India Visit | एलन मस्क यांच्या भारत भेटीकडे जगाचे लक्ष; टेस्लासह स्टार लिंकची घोषणा शक्य
Latest Marathi News अपहरण प्रकरणी माजी मंत्री अमरमणी त्रिपाठींना मोठा झटका, मालमत्ता जप्त Brought to You By : Bharat Live News Media.
