जळगाव: अवकाळीचा ६१८ हेक्टरवरील पिकांना तडाखा

जळगाव, Bharat Live News Media वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे अमळनेर, यावल, भुसावळ, जळगाव, बोदवड या तालुक्यातील 57 गावांमधील 1002 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर 618.70 हेक्टर वरील ज्वारी, बाजरी, गहू, भाजीपाला, मका, केळी, पपई लिंबू, आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
अमळनेर तालुक्यातील 38 गावांमधील 747 शेतकऱ्यांचे ज्वारी 103 हेक्टर, बाजरी 125.70, गहू 15, भाजीपाला 38.70, मका १४६.८०, केळी 7. पपई 9.7, फळ 37.90 असे 483.70 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
यावल तालुक्यातील 15 गावांमधील 232 शेतकऱ्यांचे मका 36 .10, केळी 63.90 असे 100 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. भुसावळ तालुक्यातील एका गावातील 25 शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. यात 8 हेक्टरवरील लिंबाचे नुकसान झाले आहे. जळगाव तालुक्यातील दोन गावांमधील 55 शेतकऱ्यांचे 25 ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. बोदवड तालुक्यातील एका गावातील दोन शेतकऱ्यांचे दोन हेक्टर वरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील सत्तावीस गाव मधील 1062 शेतकऱ्यांचे ज्वारी 128, बाजरी 125.70, गहू 15, भाजीपाला 38.70, मका 182.90, केळी 72.90, पपई 9.60, लिंबू 8, फळपिके 37.90 असे 618.70 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालेले आहे.
हेही वाचा
जळगाव: जिल्हाधिकाऱ्यांकडून जामनेर तालुक्यातील अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
जळगाव | शाळेचे उडालेले पत्रे बसविण्यासाठी शिक्षकच झाले कारागीर, सर्वत्र कौतुक
जळगाव | १४ लाखांचा गुटखा जप्त ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Latest Marathi News जळगाव: अवकाळीचा ६१८ हेक्टरवरील पिकांना तडाखा Brought to You By : Bharat Live News Media.
