सरकार आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार: राहुल गांधी

भंडारा: Bharat Live News Media वृत्तसेवा : मी माझ्या यात्रेदरम्यान लाखो शेतकऱ्यांशी संवाद साधला. अरबपतींचे कर्ज माफ होतात, पण आमचे कर्ज माफ होत नाही, असा सवाल शेतक ऱ्यांनी केला. या देशातील शेतकऱ्यांसमोर आजही अनेक समस्या आहेत. त्यामुळे आमचे सरकार येताच सर्वप्रथम देशातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार. कानुनी एमएसपी, जातिनिहाय जनगणना आणि ३० लाख सरकारी नोकर भरती केली जाईल. ही कॉंग्रेसची गॅरंटी आहे, अशी ग्वाही कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिली. ते भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारसभेत आज (दि.१३) बोलत होते. Rahul Gandhi
ते म्हणाले, आम्ही जो घोषणापत्र तयार केला, तो बंंद खोलीत नव्हे तर देशातील हजारो लोकांकडून, शेतकरी, कामगार, बेरोजगार, महिलांसोबत चर्चा करुन तयार करण्यात आलेला आहे. हा काँग्रेस पक्षाचा घोषणापत्र नसून तो जनतेचा घोषणापत्र असून आपल्या मनातील गोष्ट आम्ही येथे लिहून ठेवल्याचा उल्लेख त्यांनी केला. कोरोना काळात प्रधानमंत्री थाळी वाजविण्याचे व मोबाईलचे लाईट लावण्याचे काम करीत होते. प्रधानमंंत्री मोदी म्हणतात मी ओबीसी आहे. परंतु ओबीसी समाजाकडे त्यांचे लक्ष नाही. या देशात जेवढी लोकसंख्या आदिवासी, दलित, ओबीसींची आहे, त्यांचा वाटा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नाही. त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व देण्याचे काम आमचे सरकार करणार आहे. भाषणादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांवरही टीका केली. Rahul Gandhi
राहुल गांधी म्हणाले, आमची सरकार येताच अग्निवीर योजना रद्द केली जाईल. आम्हाला दोन प्रकारचे शहीद नकोत. ही योजना आर्मीने तयार केली नसून प्रधानमंत्री कार्यालयाने तयार केलेली योजना आहे. लघुउद्योगावर लावलेली जीएसटी रद्द करणार, एकच टॅक्सप्रणाली राहणार. शेतकरी वर्गावरही लादलेला १८ टक्के जीएसटी आम्ही रद्द करणार, गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी एक लाख रुपये देणार, तरुणांसाठी अप्रेंटिस योजना लागू करणार, सरकार नोकरीभरती खासगी नव्हे, तर सरकारी यंत्रणेमार्फत राबविणार असल्याचे ते म्हणाले.
देशाच्या प्रथम व्यक्ती असलेल्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या आदिवासी समाजातील असल्यामुळेच त्यांना राममंदिराच्या शुभारंभप्रसंगी निमंत्रित करण्यात आले नाही. कारण त्या आदिवासी समाजाच्या आहेत, फक्त धर्माच्या नावावर जनतेला भ्रमित करण्याचे काम केंद्रातील सरकार करीत आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील उद्योगपतींकरीता हा देश चालविला असून त्याचा लाभ मोजक्या उद्योगपतींना होत आहे. जेव्हा जेव्हा मोदींची सरकार येते तेव्हा तेव्हा अदानींसारख्या उद्योगपतींचे शेयर मुल्य वाढते. त्यामुळे हे सरकार अदानीचे सरकार असल्याची टीका त्यांनी केली.
मंचावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, खासदार चंद्रकांत हांडोरे, माजी आमदार माणिकराव ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, पूर्व विदर्भातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार विकास ठाकरे, नामदेव किरसान, प्रतिभा धानोरकर, श्यामकांत बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा
राहुल गांधी १३ एप्रिलला महाराष्ट्रात, नाना पटोलेंच्या आग्रहास्तव पहिल्यांदाच भंडारा दौऱ्यावर
Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी १३ एप्रिलला महाराष्ट्रात, नाना पटोलेंच्या आग्रहास्तव पहिल्यांदाच भंडारा दौऱ्यावर
राहुल गांधी यांच्याकडे 20 कोटींची संपत्ती!
Latest Marathi News सरकार आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार: राहुल गांधी Brought to You By : Bharat Live News Media.
