नागपुरात महायुतीच्या बैठकांना जोर: माढा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, मुंबईचा तिढा कायम

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदर्भातील दोन सभानंतर पहिल्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. महायुती सर्व जागा जिंकणार असा दावा केला जात असताना दुसरीकडे माढा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, मुंबईतील इतर जागाबाबत भाजप शिवसेनेच्या एकापेक्षा अधिक दावेदारांनी वाढविलेला तिढा सोडविण्यासाठी नागपुरात बैठकांना वेग आला आहे. एकंदरीत सध्या प्रचाराच्या रणधुमाळीत नागपूर फडणवीस -बावनकुळे या जोडगोळीमुळे नागपूर … The post नागपुरात महायुतीच्या बैठकांना जोर: माढा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, मुंबईचा तिढा कायम appeared first on पुढारी.

नागपुरात महायुतीच्या बैठकांना जोर: माढा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, मुंबईचा तिढा कायम

राजेंद्र उट्टलवार

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदर्भातील दोन सभानंतर पहिल्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. महायुती सर्व जागा जिंकणार असा दावा केला जात असताना दुसरीकडे माढा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, मुंबईतील इतर जागाबाबत भाजप शिवसेनेच्या एकापेक्षा अधिक दावेदारांनी वाढविलेला तिढा सोडविण्यासाठी नागपुरात बैठकांना वेग आला आहे. एकंदरीत सध्या प्रचाराच्या रणधुमाळीत नागपूर फडणवीस -बावनकुळे या जोडगोळीमुळे नागपूर महत्वाचे सत्ता केंद्र झाले आहे. Mahayuti Seat Sharing
अमरावती, यवतमाळ, हिंगोली, नाशिक,माढा पाठोपाठ आता कोकण,मुंबईतील मतदारसंघाची चर्चाही नागपुरात होत आहे. आज अमित शहा देखील विदर्भात असल्याने या बैठकीला महत्व आले. थेट दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी संवाद साधून मार्ग काढण्याच्या दृष्टीने राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्व सत्ताबदलानंतर वाढले आहे. Mahayuti Seat Sharing
उपमुख्यमंत्री फडणवीस ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उद्योग मंत्री उदय सामंत नागपुरातून तीन दिशांना प्रचारसभांसाठी रवाना होण्यापूर्वी या जागा संदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. महायुतीचा उमेदवारच या ठिकाणी लढेल असे तूर्त सांगितले जात असताना नेमकं कोण लढणार याबाबत अनिश्चितता कायम आहे. दरम्यान,उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धरमपेठ येथील निवासस्थानी भेट घेतली.या भेटीत प्रत्येक वेळी रत्नागिरी सिंधुदुर्गची चर्चा होईल असे तुम्ही समजू नका, असे माध्यमांशी बोलताना त्यांनी आधीच स्पष्ट केले.
मात्र, काल माढा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्यानंतर आज कोकणमधील काही जागांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी केलेल्या यवतमाळ, हिंगोली नांदेड,बुलढाणा, रामटेक आदी भागातील दौऱ्याबाबत फडणवीस यांना माहिती दिली. संजय राऊत यांच्या टिकेबाबत रोज सकाळच्या पत्रकार परिषदेला आपण एवढं गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही असा टोला लगावला.आशिष शेलार हे काल माझ्यासोबत होते, महायुतीचा प्रचार ते करत आहेत. आम्ही देखील महायुतीचा प्रचार करत आहोत.वैयक्तिक कोणाचाही प्रचार सुरू झालेला नाही.रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागा ही अजून कोणालाही फायनल झालेली नाही.
नेते मंडळींच्या चर्चेनंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागा ही ठरेल आणि महायुतीच्याच उमेदवाराला मिळणार आहे. आम्ही देखील महायुतीच्याच उमेदवाराचा प्रचार करणार आहोत असा सावध पवित्रा घेतला. दरम्यान, किरण सामंत यांच्याबाबत बोलताना त्यांना अजित पवार यांचे भाषण आवडले म्हणून टाकलेला तो व्हिडिओ होता.यामागे काही राजकीय हेतू आहे असे मला वाटत नाही. प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य असल्याचे सांगितले.
रवींद्र वायकर यांच्याविषयी जे काही निर्णय होतील त्या निर्णयाबरोबर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षातील सर्व कार्यकर्ते काम करतील. नारायण राणे हे महायुतीतील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या वक्तव्यावर मी माझं मत मांडणं हे चुकीच आहे, असे स्पष्ट केले. यानंतर उपमुख्यमंत्री नागपूर, रामटेक, चंद्रपूर सभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरच्या दिशेने तर उदय सामंत, महायुतीच्या बुलढाणा लोकसभेचे महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ हेलिकॉप्टरने रवाना झाले.
हेही वाचा 

नागपूर विमानतळावर रनवेचे दिवे बंद, अनेक विमाने खोळंबली, प्रवासी संतप्त !
नागपूर : नवनीत राणा यांचे प्रचार कार्यालय वादळी पावसाने जमीनदोस्त
नागपूर : राहुल गांधी, अमित शहा आज पूर्व विदर्भात; प्रचार सभेवर पावसाचे सावट

Latest Marathi News नागपुरात महायुतीच्या बैठकांना जोर: माढा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, मुंबईचा तिढा कायम Brought to You By : Bharat Live News Media.