‘तृणमूल’च्‍या कार्यकर्त्यासोबत अधीर रंजन यांचा ‘राडा’, व्‍हिडिओ व्‍हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्‍चिम बंगालमध्‍ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. राज्‍यातील बेहरामपूर येथील काँग्रेसचे उमेदवार अधीर रंजन चौधरी यांनी आमच्‍या कार्यकर्त्याला धक्‍काबुक्‍की केली, असा दावा करणारा व्‍हिडिओ तृणमूल काँग्रेसने शेअर केला आहे. हे लज्जास्पद कृत्य सर्वांनी पाहावे, असे आवाहनही मतदारांना केले आहे. या घटनेनंतर राज्‍यात काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस पुन्‍हा आमने-सामने आले आहेत. … The post ‘तृणमूल’च्‍या कार्यकर्त्यासोबत अधीर रंजन यांचा ‘राडा’, व्‍हिडिओ व्‍हायरल appeared first on पुढारी.
‘तृणमूल’च्‍या कार्यकर्त्यासोबत अधीर रंजन यांचा ‘राडा’, व्‍हिडिओ व्‍हायरल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : पश्‍चिम बंगालमध्‍ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. राज्‍यातील बेहरामपूर येथील काँग्रेसचे उमेदवार अधीर रंजन चौधरी यांनी आमच्‍या कार्यकर्त्याला धक्‍काबुक्‍की केली, असा दावा करणारा व्‍हिडिओ तृणमूल काँग्रेसने शेअर केला आहे. हे लज्जास्पद कृत्य सर्वांनी पाहावे, असे आवाहनही मतदारांना केले आहे. या घटनेनंतर राज्‍यात काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस पुन्‍हा आमने-सामने आले आहेत.
‘तृणमूल’ने केला धक्‍काबुक्‍कीचा आरोप
अधीर रंजन चौधरी यांनी आमच्‍या कार्यकर्त्याला धक्‍काबुक्‍की केली, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. याचा व्हिडिओही तृणमूलने शेअर केला आहे.
‘तृणमूल’ने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” भरदिवसा काँग्रेस खासदार आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला हिंसकपणे धक्काबुक्की करताना रंगेहात पकडले गेले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे लज्जास्पद कृत्य सर्वांनी पाहावेण असे रेकॉर्ड केले आहे.  हा प्रकार म्‍हणजे ‘निव्वळ गुंडागर्दी’ म्हटले आहे. बहरामपूरमधील तुमची गुंडगिरी नजरेआड होणार नाही. तुमची निवडणूक हरण्याची भीती तुमच्या कृतीतून स्पष्ट दिसते. कामगार तुम्हाला काहीही मदत करणार नाहीत!”

SHEER DISPLAY OF HOOLIGANISM BY ADHIR RANJAN CHOWDHURY
Your thuggery in Baharampur won’t go unnoticed. Your fear of losing elections is pretty evident from your actions. But using muscle power to intimidate our workers won’t help you in anyway!
SHAME! pic.twitter.com/eQFgFD0IRD
— All India Trinamool Congress (@AITCofficial) April 13, 2024

विशेष म्‍हणजे भाजप विरोधी इंडिया आघाडीमध्‍ये काँग्रेस आणि तृणमूल हे मित्रपक्ष आहेत. मात्र पश्‍चिम बंगालमध्‍ये दोन्‍ही पक्ष स्‍वबळावर निवडणूक लढवत आहेत. बहरामपूरमध्ये अंधीर रंजन चौधरी यांच्‍या विरोधात तृणमूलचे युसूफ पठाण निवडणूक रिंगणात आहेत.
माझ्‍या विरोधात गो बॅकचा नारा दिला…
या घटनेबाबत ‘एएनआय’शी बोलताना अधीर रंजन चौधरी म्‍हणाले की, “मी प्रचार आटोपून घरी जात असताना, काही लोक आले आणि त्‍यांना माझ्‍याविरोधात ‘गो बॅक’चा नारा देऊ लागले. मी गाडीतून उतरलो. तेव्‍हा गेल्या मी पाच वर्षांत काहीही केले नाही, असा दावा ते करु लागले. त्‍यांनी मी विचारणा केली.

West Bengal | Congress leader and party’s Lok Sabha candidate from Berhampore Adhir Ranjan Chowdhury says, ” While I was going home after campaigning, few people came and started chanting ‘go back’ slogan. When I got out of the car, they started saying that I haven’t done… https://t.co/cmFH2LdB0P pic.twitter.com/LwGZjYKc8X
— ANI (@ANI) April 13, 2024

बहरमपूर मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्‍ला
1999 पासून अधीर रंजन चौधरी हे बहरमपूर लोकसभा मतदारसंघातून कधीही पराभूत झालेले नाहीत. बहरापूरमध्ये 13 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्व सात टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत.
हेही वाचा : 

Lok sabha election 2024 : पोपटाने वर्तवलं निवडणूक निकालाचे भाकित…व्‍हिडिओ व्‍हायरल आणि….
Lok sabha election 2024 : हेमा मालिनी यांच्‍याबाबत वादग्रस्त वक्तव्य, EC ची सुरजेवालांना नोटीस
Lok Sabha Election 2024 : हरियाणात जाट मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर

 
Latest Marathi News ‘तृणमूल’च्‍या कार्यकर्त्यासोबत अधीर रंजन यांचा ‘राडा’, व्‍हिडिओ व्‍हायरल Brought to You By : Bharat Live News Media.