देवळा येथील स्वामी शिनकर, प्रणव शेवाळे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड

देवळा येथील श्री. शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल मधील इयत्ता 8 वी तील विद्यार्थी स्वामी श्रीकांत शिनकर व प्रणव पंकज शेवाळे या विद्यार्थ्यांची एन एम एम एस या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले असून त्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली.
दोघा विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी पर्यंत दरवर्षी 12000 रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. ह्या यशाबद्दल त्यांचे संस्थेचे चेअरमन प्राचार्य हितेंद्र आहेर, सचिव प्रा.डॉ मालती आहेर, प्रशासकीय अधिकारी बी .के रौंदळ आदींसह मुख्याध्यापिका सुनीता पगार, पर्यवेक्षक चव्हाण एन के, सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
Latest Marathi News देवळा येथील स्वामी शिनकर, प्रणव शेवाळे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड Brought to You By : Bharat Live News Media.
