हिंगोली: आखाडा बाळापुरात आचारसंहिता भंगाचा चौथा गुन्हा दाखल

कळमनुरी, पुढारी वृत्तसेवा : आखाडा बाळापूर येथे परवानगी पूर्वीच निवडणूक प्रचार कार्यालय सुरु केल्याच्या आरोपावरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात एका तरुणावर शुक्रवारी रात्री उशीरा आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता भंगाचा यावर्षीच्या निवडणुकीतील हा चौथा गुन्हा आहे.code of conduct हिंगोली लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता भंग होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून … The post हिंगोली: आखाडा बाळापुरात आचारसंहिता भंगाचा चौथा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

हिंगोली: आखाडा बाळापुरात आचारसंहिता भंगाचा चौथा गुन्हा दाखल

कळमनुरी, Bharat Live News Media वृत्तसेवा : आखाडा बाळापूर येथे परवानगी पूर्वीच निवडणूक प्रचार कार्यालय सुरु केल्याच्या आरोपावरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात एका तरुणावर शुक्रवारी रात्री उशीरा आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता भंगाचा यावर्षीच्या निवडणुकीतील हा चौथा गुन्हा आहे.code of conduct
हिंगोली लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता भंग होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी आवश्‍यक सुचना दिल्या जात आहेत. राजकीय पक्षांनी प्रचारसभा, प्रचार कार्यालय यासह इतर प्रचारासाठी निवडणूक विभागाची परवानगी घ्यावी, अन्यथा आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. त्यासाठी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही विविध परवानगीसाठी एक खिडकी सुरु करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. code of conduct
लोकसभा मतदारसंघात कुठेही आचारसंहिता भंग होणार नाही, याकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र पथके स्थापन केली असून या पथकाकडून ठिकठिकाणी तपासणी देखील केली जात आहे. त्यानुसार आचारसंहिता पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दुपारीच्या सुमारास आखाडा बाळापूर येथे एका उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाची तपासणी केली. यामध्ये कार्यालय सुरु करण्यासाठी आवश्‍यक परवानगी घेतली नसल्याचे दिसून आले.
याप्रकरणी आचारसंहिता पथकाचे प्रमुख गजानन सातोनकर यांनी गुरुवारी रात्री उशीरा आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. निवडणूक विभागाची परवानगी घेण्यापूर्वीच प्रचार कार्यालय सुरु केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. यावरून पोलिसांनी नागेश बोंढारे याच्या विरुध्द आदर्श अचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार रामदास ग्यादलवाड पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा 

हिंगोली: परभणी, पूर्णा शहरात पाणीटंचाई: सिद्धेश्वर धरणातून २ हजार क्यूसेक
हिंगोली : कळमनुरी शहरात डीजे वाजविण्यावरून वाद
हिंगोली: सेनगाव येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी खरेदी- विक्री व्यवहार बंद पाडला

Latest Marathi News हिंगोली: आखाडा बाळापुरात आचारसंहिता भंगाचा चौथा गुन्हा दाखल Brought to You By : Bharat Live News Media.