दिग्दर्शकाने दिला होता २५ दिवसांचा वेळ, आयुष शर्माने करून दाखवलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयुष शर्मा नायक असलेल्या ‘रुस्लान’च्या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना भावला. ‘वजूद क्यों ढूंढे तू,जब हुनर ही तेरा साथी है’ या ‘रुस्लान’ चित्रपटाच्या दमदार संवादाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. (Ruslaan Movie) मुख्य भूमिका आयुष शर्माची असून स्वत:ची ओळख शोधण्यासाठी तो अथक प्रवासाला निघतो, ज्यामुळे त्याचे जग उद्ध्वस्त होण्याची भीती असते. दिग्दर्शक करण … The post दिग्दर्शकाने दिला होता २५ दिवसांचा वेळ, आयुष शर्माने करून दाखवलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन appeared first on पुढारी.

दिग्दर्शकाने दिला होता २५ दिवसांचा वेळ, आयुष शर्माने करून दाखवलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आयुष शर्मा नायक असलेल्या ‘रुस्लान’च्या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना भावला. ‘वजूद क्यों ढूंढे तू,जब हुनर ही तेरा साथी है’ या ‘रुस्लान’ चित्रपटाच्या दमदार संवादाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. (Ruslaan Movie) मुख्य भूमिका आयुष शर्माची असून स्वत:ची ओळख शोधण्यासाठी तो अथक प्रवासाला निघतो, ज्यामुळे त्याचे जग उद्ध्वस्त होण्याची भीती असते. दिग्दर्शक करण एल. बुटानीच्या दूरदर्शी कथेमध्ये जबरदस्त व्हिज्युअल आणि थरारक ॲक्शन सीक्वेन्स आहेत. (Ruslaan Movie)
‘रुस्लान’मध्ये थरार, सस्पेन्स व्यतिरिक्त अनेक मुद्दे आहेत जे ओळख आणि जीवनातील उद्देशांसंदर्भात भाष्य करताात.या गोष्टी प्रेक्षकांना चित्रपटाशी जोडतात. दमदार कथा आणि हृदयस्पर्शी दृश्यांसह ‘रुस्लान’चा ट्रेलर प्रेक्षकांना त्यांच्या जागेवर खिळवून ठेवतो.सुश्री मिश्राची ओळख या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून करण्यात आली आहे.
चित्रपटाबद्दल आयुष शर्मा म्हणतो की, “’रुस्लान’चा ट्रेलर जगासमोर सादर करण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहत होतो. मी माझा प्रवास सर्व प्रेक्षकांसोबत शेअर करायला फार उत्सुक आहे. सज्ज व्हा, कारण ‘रुस्लान’ तुम्हाला अशा प्रवासाला घेऊन जाणार जो प्रवास तुम्ही कधीही विसरणार नाही !”

दरम्यान, आयुषने फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनचा आपला प्रवास शेअर केला आहे. चित्रपटामध्ये बॉडी लूक ट्रेलर रिलीज नंतर तो चर्चेचा विषय बनला आहे. शुक्रवारी, त्याने आपला एक व्हिडिओ शेअर केला. त्याने सांगितले की, कशाप्रकारे केवळ भूमिका साकारण्यासाठीच नव्हे तर स्टंट दृढतेने करण्यासाठी स्वत:ला एक टफ शेड्यूलमधून नेलं.
दिग्दर्शकाने दिला होता २५ दिवसांचा वेळ
आपल्या फिटनेस विषयी बोलताना आयुष म्हणाला, “हे तेव्हा असतं, जेव्हा दिग्दर्शक म्हणतो की, आपण २५ दिवसांत लढाई शूट करू. अजरबैजानमध्ये आम्ही मायनस ६ डिग्रीवर शूट करतो. पण सातत्याने सिक्स-पॅक स्थितीमध्ये राहणं आरोग्यदायी नसतं. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करतो. संपूर्ण वर्षाचे शूटची स्थिती अशा सिक्स पॅकमध्ये बनवून ठेवणे आरोग्यदायी नसतं.

 

View this post on Instagram

 
A post shared by Aayush Sharma (@aaysharma)

अभिनेते सुश्री मिश्रा यांनी सांगितले की, “एक अभिनेता म्हणून ‘रुस्लान’चा एक भाग बनणे हा एक रोमांचक आणि आव्हानात्मक प्रवास आहे.आमच्या ट्रेलर द्वारे मी आम्ही बनवलेल्या जगाची झलक प्रेक्षकांना दाखवण्यासाठी उत्सुक आहे. मला खात्री आहे की प्रेक्षक ‘रुस्लान’च्या कथेत हरवून जातील. हा एक असा चित्रपट आहे जो पाहणाऱ्या प्रत्येकावर कायमची छाप सोडेल.”
दिग्दर्शक करण एल. बुटानी म्हणतात, “‘रुस्लान’चा ट्रेलर पाहून माझा उर अभिमानाने भरुन आला आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी आम्ही फार मेहनत घेतली आहे. प्रेक्षकांना आमच्या कथेशी समरस करुन घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
तर चित्रपटाचे निर्माते के.के. राधामोहन (श्री सत्य साई आर्ट्स) म्हणतात, “आम्ही एक मनोरंजक ॲक्शन थ्रिलर बनवण्याचा प्रयत्न केला आहे जो प्रेक्षकांना आकर्षित करेल. या चित्रपटात भावना, ॲक्शन सस्पेन्स आणि मनोरंजनाचे प्रत्येक घटक आहेत.” चित्रपटाच्या ट्रेलरने आमच्या प्रेक्षकांना कथेची झलक दिली आहे आणि मला खात्री आहे की कथा त्यांना नक्कीच आवडेल.”
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आल्याने प्रेक्षकांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढताना दिसून येत आहे. ही अनोखी कहाणी पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटात आयुष शर्मा, सुश्री मिश्रा, जगपती बाबू आणि विद्या मालवदे मुख्य भूमिकेत आहेत. ‘रुस्लान’चे दिग्दर्शन करण एल. बुटानी यांनी केले असून याची निर्मिती के. के. राधामोहन (श्री सत्य साई आर्ट्स) यांनी केली आहे. हा चित्रपट २६ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. तर एनएच स्टुडिओद्वारे ‘रुस्लान’ जगभरात प्रदर्शित केला जाईल.
Latest Marathi News दिग्दर्शकाने दिला होता २५ दिवसांचा वेळ, आयुष शर्माने करून दाखवलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन Brought to You By : Bharat Live News Media.