मल्लिकार्जुन खर्गे उद्या दीक्षाभूमीत येणार; प्रियंका गांधींचा दौरा अनिश्चित!

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे महविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज शनिवारी दुपारी 4 वाजता जाहीर सभा होणार आहे. तसेच रविवारी १४ एप्रिल रोजी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे नागपुरात दीक्षाभूमी येथे येणार असून चंद्रपूर मतदारसंघात त्यांची सभा होणार आहे. प्रियंका गांधी यांच्या दौऱ्याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चंद्रपूर आणि रामटेक मतदारसंघात कन्हान येथे दोन सभा झालेल्या असताना राज्यातील राहुल गांधी यांची ही पहिलीच निवडणूक प्रचार सभा असणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या होमग्राऊंडवर ही जाहीर सभा होत असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आपण दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली. आपल्या प्रचारासाठी प्रियंका गांधी येतीलच, असा विश्वास व्यक्त केला आहे.
हेही वाचा :
एक व्यक्ती, एक पक्ष ही वृत्ती घातक: उद्धव ठाकरे
भूमिका बदलणं आवश्यक: मोदींना पाठिंबा देण्याबाबत राज ठाकरेंचा मोठा खुलासा
Latest Marathi News मल्लिकार्जुन खर्गे उद्या दीक्षाभूमीत येणार; प्रियंका गांधींचा दौरा अनिश्चित! Brought to You By : Bharat Live News Media.
