दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद-सैफ अली १७ वर्षांनंतर पुन्हा एकत्र

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद अभिनेता सैफ अली खान हे काही दिवसांपूर्वी एकत्र दिसले होते. आता ही जोडी पुन्हा एकत्र काम करणार का? हे पाहणं उत्कंठावर्धक असणार आहे. मार्फ्लिक्स पिक्चर्सच्या बाहेर पापाराझींनी त्यांना एकत्र स्पॉट केलं आहे
आता सगळ्यांना या जोडीच्या Reunion ची उत्सुकता आहे. (Sidharth Anand-Saif Ali Khan) या दिग्दर्शक-अभिनेता जोडीने सलाम नमस्ते (२००५) आणि ता रा रम पम (२००७) मध्ये एकत्र काम केले होते. त्यांच्या शेवटच्या प्रोजेक्ट्स नंतर १७ वर्षांनंतर हे पुन्हा एकत्र आले आहे. कोणतीही अधिकृत घोषणा नसली तरी ते एकत्र एका प्रोजेक्टसाठी काम करणार असल्याचा चर्चा आहेत. (Sidharth Anand-Saif Ali Khan)
सूत्रांनुसार सिद्धार्थ आनंद सैफ अली खान, जयदीप अहलावत, कुणाल कपूर आणि निकिता दत्ता अभिनीत ‘ज्वेल थीफ’ची निर्मिती करत आहे. या वृत्तांदरम्यान निर्मात्या ममता आनंदसह चित्रपट निर्मात्याला मार्फलिक्स पिक्चर्सच्या ऑफिसमध्ये कुणाल कपूरसह सैफ अली खानला भेटताना दिसले.
रॉबी ग्रेवाल दिग्दर्शित हे दिग्दर्शन सध्या निर्मितीच्या टप्प्यात आहे आणि मे महिन्यात याच आंतरराष्ट्रीय शूट होणार आहे. Marflix Pictures या त्यांच्या बॅनरखाली सिद्धार्थ आनंद आणि ममता आनंद यांनी निर्मित केलेला हा प्रकल्प आघाडीच्या OTT प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे.
Latest Marathi News दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद-सैफ अली १७ वर्षांनंतर पुन्हा एकत्र Brought to You By : Bharat Live News Media.
