शाळेचे उडालेले पत्रे बसविण्यासाठी शिक्षकच झाले कारागीर, सर्वत्र कौतुक

जळगाव, नरेंद्र पाटील- गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना तर बसलाच आहे त्याशिवाय शाळेच्या इमारतींनाही बसत आहे. दि. 12 रोजी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे यावल तालुक्यातील मोहराळे येथील जि . प शाळेवरील पत्रे उडाले. उडालेले पत्रे पुन्हा छतावर लावण्यासाठी सरकारी अनुदान किंवा सरकारी पंचनाम्याची वाट न पाहता येथील शिक्षकांनीच पुढाकार … The post शाळेचे उडालेले पत्रे बसविण्यासाठी शिक्षकच झाले कारागीर, सर्वत्र कौतुक appeared first on पुढारी.

शाळेचे उडालेले पत्रे बसविण्यासाठी शिक्षकच झाले कारागीर, सर्वत्र कौतुक

जळगाव, नरेंद्र पाटील- गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना तर बसलाच आहे त्याशिवाय शाळेच्या इमारतींनाही बसत आहे. दि. 12 रोजी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे यावल तालुक्यातील मोहराळे येथील जि . प शाळेवरील पत्रे उडाले. उडालेले पत्रे पुन्हा छतावर लावण्यासाठी सरकारी अनुदान किंवा सरकारी पंचनाम्याची वाट न पाहता येथील शिक्षकांनीच पुढाकार घेत कारागीर होऊन स्वतः छतावर पत्रे बसवले. त्यामुळे जिल्ह्यात त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.

पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे यावल तालुक्यातील मोहराळे या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद शाळाचे पत्रे उडाले.  शुक्रवारची घटना असल्यामुळे शनिवारी सकाळी शिक्षक शाळेवर आल्यानंतर पत्रे उडालेले दिसले. शाळा व्यवस्थापन समिती येईल वरिष्ठ अधिकारी येथील ते पंचनामे करतील, पंचनामे झाल्यानंतर अनुदान येईल. या सर्व गोष्टींमध्ये खूप काही वेळ निघून जाईल. तसेही आता लोकसभेचे कामे शिक्षक व अधिकाऱ्यांवर आलेली असल्याने वेळेत हे काम पूर्ण होईल की नाही यात शंका कुशंका न घेत बसतात व कोणाची वाट न पाहता मोहराळे शाळेचे बीएलओ जहाबीर भिका तडवी,अमोल गुलाब भोई आणि युवराज अहमद तडवी या शिक्षकांनी स्वतः छतावरी उडालेले पत्र बसवण्यासाठी पुढाकार घेतला सर्व विद्यार्थ्यांना एका वर्गात बसून त्यांनी छतावरची पत्रे बाजारातून खिळे आणून स्वतः कारागीर होऊन बसवली.

शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवणेच नाही तर वेळ पडली तर कोणतेही काम करू शकतो शिक्षकांनी दाखवून दिले. याची माहिती यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना मिळताच त्यांनी BLO आणि सहकारी शिक्षक जहाबीर भिका तडवी, अमोल गुलाब भोई आणि युवराज अहमद तडवी या तीनही शिक्षकांचा तहसील कार्यालय यावल येथे शाल आणि श्रीफळ देवून सत्कार केला.
हेही वाचा –

Uddhav Thackeray on BJP : एक व्यक्ती, एक पक्ष ही वृत्ती घातक: उद्धव ठाकरे
नागपूर विमानतळावर रनवेचे दिवे बंद, अनेक विमाने खोळंबली, प्रवासी संतप्त !

Latest Marathi News शाळेचे उडालेले पत्रे बसविण्यासाठी शिक्षकच झाले कारागीर, सर्वत्र कौतुक Brought to You By : Bharat Live News Media.