मक्क्याच्या शेतात खेळत होते झन्ना-मन्ना जुगार; पोलिसांची अचानक धाड

जळगाव- यावल तालुक्यातील कोरपावली येथे पोलिसांच्या पथकाने झन्ना-मन्ना जुगार खेळतांना चार जणांवर कारवाई केली आहे. जुगाराच्या साहित्यासह सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यावल तालुक्यातील कोरपावली या गावात फैजपुर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपुर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली झन्ना-मन्ना जुगार खेळणाऱ्यांवर धाड टाकण्यात आली. यामध्ये अजीज शमशेर तडवी यांच्या मक्क्याच्या शेतात कमलेश आत्माराम पाटील राहणार जळगाव, अजीज शमशेर तडवी राहणार कोरपावली तालुका यावल, हुसैन खान अख्तर खान राहणार यावल, तुषार दिलीप तायडे या मंडळीने स्वताच्या फायद्यासाठी गैरकायद्याने झन्ना-मन्ना हा हारजितचा पत्ता जुगार खेळतांना मिळून आलेत. त्याच्या जवळून जवळपास चार मोटर सायकल, दोन मोबाईल व रोख रक्कम असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोहेकॉ गणेश प्रल्हाद मनुरे यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल चे पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर व सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने कार्यवाही केली आहे.
हेही वाचा –
Career in Tourism | पर्यटन क्षेत्रात रोजगाराची मोठी संधी, जाणून घ्या पर्यटनविषयक अभ्यासक्रमांविषयी
लोकसभेच्या निकालावर विधानसभेची गणिते! शिरूरमध्ये विधानसभा इच्छुकांमध्ये संभ्रम वाढला
Latest Marathi News मक्क्याच्या शेतात खेळत होते झन्ना-मन्ना जुगार; पोलिसांची अचानक धाड Brought to You By : Bharat Live News Media.
