सिडनी मॉलमध्ये चाकूहल्‍ल्‍यासह गोळीबारात ५ ठार, पोलिसांनी हल्‍लेखोरास टिपले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ऑस्‍ट्रेलियातील सिडनी शहरात मॉलमध्‍ये माथेफिरुने केलेल्‍या चाकूहल्‍ल्‍यात ६ जण ठार झाले आहेत. या धक्‍कादायक घटनेनंतर पोलिसांनी केलेल्‍या गोळीबारात हल्‍लेखोरही ठार झाला आहे. सिडनी शहरातील गजबजलेल्‍या वेस्टफिल्ड बोंडी जंक्शन शॉपिंग सेंटरमध्‍ये चाकू घेऊन आलेल्या व्यक्तीने अचानक चौघांना हल्‍ला केला. यामध्‍ये हल्‍लेखाेरासह ६ जण ठार झाले आहेत.अनेकजण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. … The post सिडनी मॉलमध्ये चाकूहल्‍ल्‍यासह गोळीबारात ५ ठार, पोलिसांनी हल्‍लेखोरास टिपले appeared first on पुढारी.

सिडनी मॉलमध्ये चाकूहल्‍ल्‍यासह गोळीबारात ५ ठार, पोलिसांनी हल्‍लेखोरास टिपले

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : ऑस्‍ट्रेलियातील सिडनी शहरात मॉलमध्‍ये माथेफिरुने केलेल्‍या चाकूहल्‍ल्‍यात ६ जण ठार झाले आहेत. या धक्‍कादायक घटनेनंतर पोलिसांनी केलेल्‍या गोळीबारात हल्‍लेखोरही ठार झाला आहे.
सिडनी शहरातील गजबजलेल्‍या वेस्टफिल्ड बोंडी जंक्शन शॉपिंग सेंटरमध्‍ये चाकू घेऊन आलेल्या व्यक्तीने अचानक चौघांना हल्‍ला केला. यामध्‍ये हल्‍लेखाेरासह ६ जण ठार झाले आहेत.अनेकजण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तत्‍काळ घटनास्‍थळी धाव घेतली. हल्‍लेखोराने केलेल्‍या हल्‍ल्‍यात एक महिला आणि तिच्या मुलासह मॉलमधील एक कर्मचारी ठार झाला. पोलिसांनी केलेल्‍या कारवाईत हल्‍लेखोर ठार झाला आहे.

6 people are dead including a suspect in a Sydney shopping center stabbing attack, police say, reports AP
— Press Trust of India (@PTI_News) April 13, 2024

हल्‍ल्‍यातील अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या अनेक पोस्ट्समध्ये लोक घाबरून मॉलमधून बाहेर पळत असल्याचे आणि पोलिस वाहने आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्याचे दिसत आहे.

Breaking: Police operation at Bondi Junction: Reports of stabbing, shots fired at shopping centre https://t.co/uDT73c3Oo2
— The Sydney Morning Herald (@smh) April 13, 2024

पोलिसांच्‍या गोळीबारात हल्‍लेखोर ठार
मॉलमधील प्रत्‍यदर्शींनी सांगितले की, एक व्यक्ती चाकू घेऊन मॉलच्या आत पळत होता, त्याने चार जणांवर हल्ला केला. मात्र, पोलिसांनी केलेल्‍या गोळीबारात तो ठार झाला. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे की, हल्‍लेखोर एकटाच होता.
प्रत्‍यदर्शींनी सांगितले की, मॉलमधून गोळीबाराचा आवाज येत होता. सुमारे चार जणांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. घटनेनंतर गर्दी इकडे तिकडे धावताना दिसली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या अनेक गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ऑस्‍ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्‍बानीज यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्‍यक्‍त केले आहे. या हल्‍ल्‍यात अनेक बळींची नोंद झाली आहे. ऑस्‍ट्रेलियाचे सरकार या हल्‍ल्‍यात मृत्‍युमुखी पडलेल्‍या आणि जखमी झालेल्‍यांच्‍या प्रियजनांसोबत असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटलं आहे.

I have been briefed by the AFP on the devastating events at Bondi Junction.
Tragically, multiple casualties have been reported and the first thoughts of all Australians are with those affected and their loved ones.
— Anthony Albanese (@AlboMP) April 13, 2024

हेही वाचा : 

Balochistan Pakistan | पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी केली ११ जणांची हत्या
चीनच्या शिरजोरीला पं. नेहरू जबाबदार : परराष्ट्रमंत्री डॉ.एस.जयशंकर

Latest Marathi News सिडनी मॉलमध्ये चाकूहल्‍ल्‍यासह गोळीबारात ५ ठार, पोलिसांनी हल्‍लेखोरास टिपले Brought to You By : Bharat Live News Media.