लखनौच्या आयुष बदोनी-अर्शद खानने रचला इतिहास

पुढारी ऑनलाईन डेस्क : लखनौ सुपर जायंट्सचा फलंदाज आयुष बदोनी (Ayush Badoni) याने शुक्रवारी (दि.१२) अर्शद खानसोबत (Arshad Khan) आठव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली. बदोनी आणि अर्शद जोडीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या (LSG vs DL) सामन्यात ४५ चेंडूत ७३ धावांची धडाकेबाज भागीदारी रचली. आयपीएलच्या इतिहासातील आठव्या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. (IPL 2024) संबंधित बातम्या :  … The post लखनौच्या आयुष बदोनी-अर्शद खानने रचला इतिहास appeared first on पुढारी.

लखनौच्या आयुष बदोनी-अर्शद खानने रचला इतिहास

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लखनौ सुपर जायंट्सचा फलंदाज आयुष बदोनी (Ayush Badoni) याने शुक्रवारी (दि.१२) अर्शद खानसोबत (Arshad Khan) आठव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली. बदोनी आणि अर्शद जोडीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या (LSG vs DL) सामन्यात ४५ चेंडूत ७३ धावांची धडाकेबाज भागीदारी रचली. आयपीएलच्या इतिहासातील आठव्या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. (IPL 2024)
संबंधित बातम्या : 

गंभीरला दिलेल्‍या ‘जादू की झप्पी’वर विराटने सोडले मौन, म्‍हणाला…
IPL : पराभवापाठोपाठ १२ लाखांचा दंड, संजू सॅमसनला ‘दुहेरी’ धक्‍का!
हार्दिक पंड्याला 4.3 कोटींचा गंडा, भावाकडून फसवणूक; गुन्हा दाखल
सलग दुसर्‍या विजयाचे लक्ष्य; मुंबई इंडियन्सचा आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी सामना
‘साठी बुद्धी नाठी..!’ : रवी शास्त्रींच्या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ

लखनौला (LSG vs DL) आपल्या घरच्या मैदानावर दिल्लीकडून पराभव स्वीकारावा लागला. पृथ्वी शॉ, ऋषभ पंत आणि जॅक फ्रेजर-मॅकगर्क यांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने दोन गुण मिळवले. प्रथमच दिल्लीने १६० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौला पराभवाची धूळ चारली. लखनौची धावसंख्या ७ बाद ९४ अशी झाली असताना आयुष बदोनीने (Ayush Badoni) झुंझार खेळी करत संघाला १८ व्या षटकात १५० धावांचा टप्पा पार करून दिला. त्याला अर्शद खानने (Arshad Khan) तोलामोलाची साथ दिली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. बदोनीने ३५ चेंडूत ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला अर्शद खानने नाबाद २० धावा केल्या. या दोघांनी आठव्या विकेटसाठी ७३ धावांजी भागीदारी रचली. या दोघांमुळे लखनौला ७ बाद १६७ अशा सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. बदोनी (Ayush Badoni) आणि अर्शदने या सामन्यात स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक आठव्या विकेटसाठी भागीदारी करून आयपीएल रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव कोरले. (IPL 2024)
आयपीएलमध्ये आठव्या विकेटसाठी सर्वाधिक धावा
७३* – बदोनी-अर्शद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (LSG vs DL), २०२४
६९ – हॉज-फॉकनर विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०१४
६८ – क्लासेन-भुवी विरुद्ध गुजरात टायटन्स, २०२३
५३ – हरभजन-आर मॅकलरेन विरुद्ध डेक्कन, २०१०
५२ – रिंकू-उमेश विरुद्ध गुजरात टायटन्स, २०२३
५१* – विनय-आर रामपॉल विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०१३
५० – डौल-राऊत विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०१०
५० – क्रुणाल-जॉन्सन विरूद्ध आरपीएसजी, २०१७
हेही वाचा : 

LSG vs DC : दिल्लीने रोखला लखनौचा विजयरथ
इशान किशनची BCCI विरुद्धच्या वादावर प्रतिक्रिया, म्हणाला…
मुंबईने गड राखला; बंगळुरूवर सात गडी राखून विजय

Latest Marathi News लखनौच्या आयुष बदोनी-अर्शद खानने रचला इतिहास Brought to You By : Bharat Live News Media.