‘समता पंधरवडा’निमित्त जातवैधता प्रमाणपत्राकरिता विशेष मोहीम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत राज्यामध्ये आयोजित ‘समता पंधरवडा’निमित्त 2023-24 बारावी विज्ञान आणि पदवी अभ्यासक्रम प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच बारावीच्या परीक्षा झाल्या असून, एमएचटी- सीईटी, नीट, जेईई, एमबीए, पीएचडी, बीएस्सी अ‍ॅग्री, … The post ‘समता पंधरवडा’निमित्त जातवैधता प्रमाणपत्राकरिता विशेष मोहीम appeared first on पुढारी.

‘समता पंधरवडा’निमित्त जातवैधता प्रमाणपत्राकरिता विशेष मोहीम

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत राज्यामध्ये आयोजित ‘समता पंधरवडा’निमित्त 2023-24 बारावी विज्ञान आणि पदवी अभ्यासक्रम प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच बारावीच्या परीक्षा झाल्या असून, एमएचटी- सीईटी, नीट, जेईई, एमबीए, पीएचडी, बीएस्सी अ‍ॅग्री, बी-फार्म, बीएस्सी नर्सिंग आदी व्यावसायिक अभ्यासक्रम, तसेच अभियांत्रिकी थेट द्वितीय वर्षाला प्रवेशोत्सुक विद्यार्थांना जात प्रमाणपत्र पडताळणी आवश्यक असते. मागासवर्गीय विद्यार्थांना संविधानिक आरक्षणातून लाभ मिळत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बार्टीच्या संकेतस्थळावर तत्काळ ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रत जिल्हा जात पडताळणी समिती विश्रांतवाडी येरवडा येथील कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावी.
अर्जासोबत अर्जदाराचे जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, महाविद्यालयाचे शिफारस पत्र, शपथपत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट आदी नियमानुसार लागणार्‍या पुराव्याच्या साक्षांकित प्रती जोडून आपल्या जात पडताळणीचा परिपूर्ण अर्ज तत्काळ वेळेत सादर करावा. अर्ज वेळेत सादर न केल्यास विद्यार्थी शैक्षणिक प्रवेशासाठी वंचित राहण्याची शक्यता आहे.
जातवैधता प्रमाणपत्राकरिता अगोदर अर्ज सादर केलेल्या व त्रुटींअभावी अर्ज प्रलंबित असलेल्यांना समितीने मोबाईल/ ई-मेलद्वारे संदेश पाठविले आहेत. अशा अर्जदारांनी देण्यात आलेल्या सूचनेनुसार आवश्यक कागदपत्रे घेऊन व आपल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी प्रत्यक्ष जिल्हा जात पडताळणी कार्यलयात उपस्थित राहावे. महाविद्यालये, विद्यार्थी व पालकांनी जात पडताळणी प्रस्ताव कार्यालयाकडे जमा करावेत, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त तथा जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष डॉ. दिनेश डोके, उपायुक्त तथा सदस्य डॉ. दीपक खरात आणि संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव संतोष जाधव यांनी केले आहे.

हेही वाचा
पीएमपीच्या बस मार्गांत उद्या मोठा बदल; असा असेल बदल
नागपूर : नवनीत राणा यांचे प्रचार कार्यालय वादळी पावसाने जमीनदोस्त
पिवळ्या रंगामुळे आले भलतेच संकट!

Latest Marathi News ‘समता पंधरवडा’निमित्त जातवैधता प्रमाणपत्राकरिता विशेष मोहीम Brought to You By : Bharat Live News Media.