पीएमपीच्या बस मार्गांत उद्या मोठा बदल; असा असेल बदल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उद्या रविवारी (दि.14) मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने ठिकठिकाणी मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी पीएमपीच्या बस गाड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता पीएमपी प्रशासनाने रविवारी आपल्या काही बस मार्गांमध्ये बदल केला आहे. या बदलांनुसार पीएमपीच्या प्रवाशांनी प्रवास करावा, … The post पीएमपीच्या बस मार्गांत उद्या मोठा बदल; असा असेल बदल appeared first on पुढारी.

पीएमपीच्या बस मार्गांत उद्या मोठा बदल; असा असेल बदल

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उद्या रविवारी (दि.14) मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने ठिकठिकाणी मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी पीएमपीच्या बस गाड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता पीएमपी प्रशासनाने रविवारी आपल्या काही बस मार्गांमध्ये बदल केला आहे. या बदलांनुसार पीएमपीच्या प्रवाशांनी प्रवास करावा, असे आवाहन पीएमपी अधिकार्‍यांकडून करण्यात आले आहे.
असे आहेत बस मार्ग बदलाचे नियोजन

 29, 148, 148अ, 201 या मार्गांच्या बस जाता-येता साधू वासवानी चौक, अलंकार चौक व पुढे नेहमीप्रमाणे संचलनात राहतील.
 3, 5, 6, 39, 57, 140, 140 अ, 141 या मार्गांच्या बस पुणे स्टेशनकडे जाताना नरपतगीर चौकातून अथवा के. ई. एम. हॉस्पिटलजवळून उजवीकडे वळून एम्प्लॉयमेंट ऑफिस, लाल देऊळ व पुढे पुणे स्टेशन डेपो स्थानकामधून संचलनात राहतील. तसेच, परतीच्या वेळी त्याच मार्गाने संचलनात राहतील. मात्र, जास्त गर्दी होऊन रस्ता बंद झाल्यास सदर मार्गाची वाहतूक नरपतगीर चौकातून करण्यात येईल.
 24, 24अ, 31, 235, 236 या मार्गांच्या बस पुणे स्टेशनकडे जाताना नरपतगीर चौक अथवा के.ई.एम. हॉस्पिटल चौकातून रास्ता पेठ पॉवर हाऊस, एम्प्लॉयमेंट ऑफिसजवळून लाल देऊळ, पोलिस मुख्यालय व पुढे नेहमीच्या मार्गाने जातील. मात्र, परतीच्या वेळी तूर्त याच मार्गाने संचलनात राहतील.
 8, 81, 94, 108, 143, 144, 44अ, 144क, 283 या मार्गांच्या बस पुणे स्टेशनकडे जाताना नरपतगीर चौक अथवा के.ई.एम. हॉस्पिटल चौकातून एम्प्लॉयमेंट ऑफिस मार्गे लाल देऊळ, पोलिस मुख्यालय, सरळ पुढे पुणे स्टेशन डेपोतून वळवून जी.पी.ओ.पासून सोडण्यात येतील व पुढे नेहमीच्या मार्गाने संचलनात राहतील. (रास्ता पेठ पॉवर हाऊसमार्गे)
 142, 145, 146 या मार्गांच्या बस पुणे स्टेशनकडे जाता- येता पेटीट इस्टेट स्थानकावरून सुटून जी.पी.ओ., लाल देऊळ, जिल्हा परिषद चौक, गाडीतळमार्गे नेहमीच्या मार्गाने संचलनात राहतील.
 86, 98, 102, 131, 132, 133, 133अ, 135, 137, 147, 158, 159, 159ब, 162, 164, 165, 169, 234, 237 या मार्गांच्या बस जुना बाजार, गाडीतळ चौकानंतर गाडीतळ, लाल देऊळ, कमिशनर ऑफिस व पुढे नेहमीच्या मार्गाने संचलनात राहतील.
112, 139, 139अ, 160, 168, 175, 182, 204, 208, मेट्रो शटल 17 या मार्गांच्या बस हडपसर अथवा मुंढवा गांवाकडून म.न.पा. भवन, चिंचवड व निगडीकडे जाताना वेस्टएन्डनंतर लाल देऊळ, जिल्हा परिषद व पुढे नेहमीच्या मार्गाने नियोजित स्थळी जाता-येता संचलनात राहतील.
170, 172, 177, 186, 187, 203 या बसमार्गांच्या बसेस पेटीट स्थानकामधून साधू वासवानी चौक, जी.पी.ओ., पोलिस मुख्यालयाजवळून जाता-येता संचलनात राहतील.
 9, 174 या बसमार्गांच्या बस पेटीट स्थानकाहून पुढे नेहमीच्या मार्गांनी जातील. परतीच्या वेळी त्याच मार्गांनी पेटीट स्थानकावर येतील.
 151, 154, 155, 163, 166, 315 या बसमार्गांवरील बस सकाळपासून पेटीट स्थानक येथून संचलनात राहतील.
 115, 225, 317, 325, 333, 348, 357, या बसमार्गांच्या बस पुणे स्टेशनकडे जाते वेळेस गाडीतळ, लाल देऊळ, कमिशनर ऑफिस, पेटीट स्थानकाकडे जाता- येता अशा संचलनात राहतील.
 311,312,366 सदर बसमार्गांच्या बसेस वाहतूक पेटीट स्थानकावरून अलंकार टॉकिज, रुबी हॉल अशा संचलनात राहतील.

हेही वाचा

AAP MP Sanjay Singh: मुख्यमंत्री केजरीवांच्या पत्नीला समोरासमोर भेटण्याची परवानगी नाकारली! खा. संजय सिंह यांचा सरकारवर आरोप
नागपूर : राहुल गांधी, अमित शहा आज पूर्व विदर्भात; प्रचार सभेवर पावसाचे सावट
खांबांवर पथदिवे बसविणार कधी? खडकवासला परिसरातील नागरिकांचा सवाल

Latest Marathi News पीएमपीच्या बस मार्गांत उद्या मोठा बदल; असा असेल बदल Brought to You By : Bharat Live News Media.