१ कोटी तरुणांना सरकारी नोकरी, ५०० रुपयांत गॅस सिलिंडर; बिहारमध्ये RJD कडून घोषणांचा पाऊस
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकांपूर्वी देशातील पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. या पार्श्वभूमीवर देशात प्रचार सभा, रॅलींचा उधान आले आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यांचे धाकटे पुत्र आणि विरोधी पक्षनेते बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दलाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यांनी राजद कार्यालयात पत्रकार परिषद घेतली आणि राजदच्या वरिष्ठ नेत्यांसोबत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. (Bihar RJD released manifesto)
आरजेडी नेते तेजस्वी यादव जाहीरनामा प्रसिद्ध करताना म्हणाले, “… आम्ही ‘परिवर्तन पत्र’च्या माध्यमातून 24 सार्वजनिक आश्वासने आणली आहेत. जर INDIA आघाडीचे सरकार स्थापन झाले तर आम्ही 1 कोटी तरुणांना सरकारी नोकऱ्या देऊ,. यासाठी सत्ता स्थापन होताच, येत्या 15 ऑगस्टपासून आम्ही तुम्हाला नोकऱ्या देण्याची प्रक्रिया सुरू करणार आहोत. येणाऱ्या रक्षाबंधनपासून आम्ही गरीब कुटुंबातील आमच्या बहिणींना दरवर्षी १ लाख रुपये मदत निधी देणार आहोत. आमच्या सरकारमध्ये आम्ही 500 रुपयांमध्ये घरगुती गॅल सिलिंडर देऊ, तसेच बिहारला विशेष राज्याचा दर्जा देणार असल्याचेही जाहीरनाम्यात सांगण्यात आले आहे. (Bihar RJD released manifesto)
मी बऱ्याच दिवसांपासून नोकऱ्या, महागाई, गरिबी आणि बेरोजगारी यावर बोलत आहे. पण, पंतप्रधान जनतेच्या प्रश्नांची आणि कामाची दखल घेत नाहीत. त्यांना फक्त त्यांच्या भावना व्यक्त करायच्या असतात. 10 वर्षात त्यांनी बिहारला काय दिले? तुम्ही दिलेली आश्वासने का पूर्ण केली नाहीत? ते या मुद्द्यांवर बोलत नाहीत, फक्त मुद्द्यांवरून लक्ष वळवण्यासाठी इतर गोष्टींवर बोलतात. बिहारचे लोक खूप हुशार आहेत, ते आगामी लोकसभेतून याचे उत्तर देतील असे देखील आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी स्पष्ट केले आहे. (Bihar RJD released manifesto)
#WATCH पटना: बिहार के पूर्व उपमुख्यमंत्री और राजद तेजस्वी यादव ने कहा, “…’परिवर्तन पत्र’ के जरिए 24 जन वचन हम लाए हैं… अगर INDIA गठबंधन की सरकार बनेगी तो हम देशभर में 1 करोड़ युवाओं को सरकारी नौकरी देने का काम हम करेंगे…आने वाले 15 अगस्त को आपको बरोज़गारी से आज़ादी मिलनी… pic.twitter.com/EW6UtbCHm3
— ANI_HindiNews (@AHindinews) April 13, 2024
Bihar RJD released manifesto: अग्निवीर योजना मागे घेऊ
आम्ही सत्तेत आल्यास अग्निवीर योजना मागे घेऊ आणि निमलष्करी दलांना शहीद दर्जा देऊ, असे देखील तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.
200 युनिट वीज मोफत देणार
तेजस्वी यादव म्हणाले की, आम्ही बिहारमध्ये 200 युनिट मोफत वीज देऊ. यातून गरीब जनतेला वीज बिलातून दिलासा मिळणार असल्याचे ते म्हणाले.
इतर काही प्रमुख घोषणा
निमलष्करी दलाच्या जवानाचा ड्युटीवर असताना मृत्यू झाल्यास त्यांना शाहीदचा दर्जा दिला जाईल.
उत्तम कनेक्टिव्हिटीसाठी, बिहारमधील पूर्णिया, गोपालगंज, भागलपूर आणि रक्सौलमध्ये विमानतळ बांधले जातील.
बिहारच्या कृषी उत्पादनांसाठी जास्तीत जास्त किरकोळ किमती सुनिश्चित करेल. शेतकऱ्यांसोबत बसून शेतकऱ्यांना समर्पित धोरणे बनवणार
स्वामिनाथन अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करणार
मंडल आयोगाच्या उर्वरित शिफारशी वंचित आणि उपेक्षितांच्या कल्याणासाठी लागू केल्या जातील.
Latest Marathi News १ कोटी तरुणांना सरकारी नोकरी, ५०० रुपयांत गॅस सिलिंडर; बिहारमध्ये RJD कडून घोषणांचा पाऊस Brought to You By : Bharat Live News Media.