लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’! भाजपकडून काँग्रेस आमदारांना ५० कोटींची ऑफर

पुढारी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’ राबवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. भाजपने सत्ताधारी काँग्रेसच्या आमदारांना ५० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचाही दावाही त्यांनी केला आहे. इंडिया टुडे टीव्हीचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी हा दावा केला आहे. कर्नाटकात लोकसभेच्या निवडणुकीत मोठा जुना पक्ष … The post लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’! भाजपकडून काँग्रेस आमदारांना ५० कोटींची ऑफर appeared first on पुढारी.
लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’! भाजपकडून काँग्रेस आमदारांना ५० कोटींची ऑफर


Bharat Live News Media ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’ राबवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. भाजपने सत्ताधारी काँग्रेसच्या आमदारांना ५० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचाही दावाही त्यांनी केला आहे. इंडिया टुडे टीव्हीचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी हा दावा केला आहे.
कर्नाटकात लोकसभेच्या निवडणुकीत मोठा जुना पक्ष हरल्यास त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पडेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. सिद्धरामय्या यांनी इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना सांगितले, “भाजप एक वर्षापासून कर्नाटकातील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या आमदारांना ५० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. त्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आले,” असे सिद्धरामय्या यांनी पुढे सांगितले.
“त्यांना काँग्रेस फोडणे शक्य होणार नाही. आमचा एकही आमदार पक्ष सोडणार नाहीत,” असा ठाम विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
The post लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’! भाजपकडून काँग्रेस आमदारांना ५० कोटींची ऑफर appeared first on Bharat Live News Media.

Go to Source