Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मानुषी छिल्लर सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. कारण एकामागे एक सुपरहिट चित्रपट करत ती प्रेक्षकांची मन जिंकून घेत आहे. (No Entry Sequel ) ‘ऑपरेशन व्हॅलेंटाइन’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि पीरियड-ड्रामा ‘सम्राट पृथ्वीराज’ यांसारख्या ॲक्शनर्सचा शोध घेतल्यानंतर मानुषी एका कॉमेडी चित्रपटात काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. (No Entry Sequel )
सूत्रांनुसार मानुषी छिल्लर, श्रध्दा कपूर आणि कृती सेनॉनसह २००५ मध्ये आलेल्या ‘नो एंट्री’ चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या ‘नो एंट्री में एंट्री’ च्या दिग्गज स्टार कास्टमध्ये सामील होणार आहेत. याची चर्चा सध्या इंडस्ट्रीत जोरदार होताना दिसतात. सूत्रांनी सांगितले की, मानुषी अर्जुन कपूर, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार असून ती मुख्य भूमिकेत या सिक्वलमध्ये सामील होणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या या प्रोजेक्ट मध्ये मानुषी पहिल्यांदा क्रिती आणि श्रध्दा स्क्रीन शेअर करणार आहे.
ही अभिनेत्री पहिल्यांदाच अर्जुन, वरुण आणि दिलजीतसोबत अभिनय करताना दिसणार आहे. मानुषी, क्रिती आणि श्रद्धा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. मानुषी छिल्लर वेगवेगळ्या शैलीतील स्क्रिप्ट्स निवडून एक उत्तम अभिनेत्री आहे हे तिने सिद्ध करून दाखवल आहे. ती सध्या अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहे. हा चित्रपट १० एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार असून या ॲक्शनरच्या रिलीजनंतर मानुषी छिल्लर जॉन अब्राहम स्टारर ‘तेहरान’मध्ये दिसणार आहे.
दरम्यान, क्रिती तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘क्रू’च्या यशाचा आनंद घेत आहे, तर श्रद्धा ‘स्त्री-२’ च्या रिलीजसाठी तयारी करत आहे.
Latest Marathi News ‘नो एन्ट्री’मध्ये मानुषी छिल्लर दिसणार? श्रद्धा कपूर-क्रिती सेनॉनसोबत तगडी ॲक्शन Brought to You By : Bharat Live News Media.