काळजी घ्या ! पुण्यात अस्वस्थ करणारे वातावरण; किमान तापमानाची कमाल

पुणे : गत दहा वर्षांत यंदा प्रथमच शहराच्या किमान तापमानात 9 ते 10 अंशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात प्रथमच अस्वस्थ करणारे वातावरण आहे. एरवी सायंकाळी 6 वाजता थंड होणारे शहर, यंदा उत्तररात्रीसुद्धा गरम आहे. रात्रीचे सरासरी किमान तापमान 24 ते 27 अंशांवर गेल्याने शहरात उष्णतेचा उद्रेक जाणवतोय. हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी … The post काळजी घ्या ! पुण्यात अस्वस्थ करणारे वातावरण; किमान तापमानाची कमाल appeared first on पुढारी.

काळजी घ्या ! पुण्यात अस्वस्थ करणारे वातावरण; किमान तापमानाची कमाल

पुणे : गत दहा वर्षांत यंदा प्रथमच शहराच्या किमान तापमानात 9 ते 10 अंशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात प्रथमच अस्वस्थ करणारे वातावरण आहे. एरवी सायंकाळी 6 वाजता थंड होणारे शहर, यंदा उत्तररात्रीसुद्धा गरम आहे. रात्रीचे सरासरी किमान तापमान 24 ते 27 अंशांवर गेल्याने शहरात उष्णतेचा उद्रेक जाणवतोय. हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी हवामान विभागाने नोंदवलेले दोन तक्ते शेअर केले. त्यांचा अभ्यास केला असता असे दिसते की, शहराचे कमाल तापमान 43 अंशांवर गेले आहे. 28 एप्रिल 2029 रोजी शहराचा पारा तब्बल 43 अंशांवर गेला होता. मग तेव्हापेक्षा यंदा जास्त उकाडा का वाटतोय, अंगाची लाही लाही होऊन अस्वस्थ का वाटतेय.
गेल्या 10 ते 13 वर्षांत प्रथमच यंदा शहराच्या किमान तापमानात मोठे बदल झाले आहेत. शहराचे सरासरी किमान तापमान 15 ते 16.5 अंशांच्या वर गेले नव्हते. यंदा ते सतत 22 ते 26 अंंशांवर आहे. त्यामुळे रात्री शहर गरम राहत आहे. रात्रीचे वाढते तापमान चिंता वाढवणारे आहे.
– डॉ. अनुपम कश्यपी, निवृत्त हवामान विभागप्रमुख, आयएमडी, पुणे

हेही वाचा

गरज पाण्याचा अपव्यय थांबविण्याची
आता हडपसर टर्मिनलवरून थेट गुवाहाटीसाठी रेल्वे..
प्रकाश आवाडेंची बंडखोरी; मुख्यमंत्र्यांच्या आजच्या दौऱ्याकडे लक्ष

Latest Marathi News काळजी घ्या ! पुण्यात अस्वस्थ करणारे वातावरण; किमान तापमानाची कमाल Brought to You By : Bharat Live News Media.