आम्ही सुरक्षित आहोत : बोगद्यात अडकलेल्या मजुरांनी दिला प्रतिसाद

आम्ही सुरक्षित आहोत : बोगद्यात अडकलेल्या मजुरांनी दिला प्रतिसाद

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमध्ये सिल्क्यारा ते दंडलगाव मार्गावरील एका बोगद्याचे काम सुरू आहे. रविवारी (दि.१२) बोगद्याचा काही भाग कोसळला होता. बोगद्यात भूस्खलन झालेल्या पुढच्या भागात ४० हून अधिक मजूर अडकले आहेत. आज (दि.१३) दुसऱ्या दिवशीही युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते. दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या मजुरांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क साधण्यात आला असून, “आम्ही सुरक्षित आहोत” असा प्रतिसाद मिळाला आहे. (Tunnel Collapse in Uttarkashi)
बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी बोगद्यातील ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पोलीस कर्मचारी बचावासाठी कार्यरत आहेत. ढिगारा हटवण्यासाठी अवजड यंत्रे लावण्यात आली आहेत. बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या पाइपलाइनमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. यासोबतच या पाईपलाईनद्वारे बोगद्यात अडकलेल्या कामगारांना अन्न व पाणी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, बाहेरून पाठवण्यात आलेल्या मदतीला अडकलेल्या मजुरांकडून प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या अडकलेल्या ४० मजुरांच्या सुरक्षेची खात्री बचाव पथकाला झाली आहे. (Tunnel Collapse in Uttarkashi
Tunnel Collapse in Uttarkashi: पाईपलाइनमधून ऑक्सिजनचा पुरवठाही
बोगद्यात अडकलेल्या मजुरांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क साधला असता, ते सुखरूप असल्याचे कामगारांनी सांगितले आहे. दरम्यान त्यांनी अन्नाची मागणी केली होती. बोगद्यात पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या पाइपलाइनमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. दरम्यान या पाइपमधूनच जेवणाची पॅकेट्स कॉम्प्रेसरद्वारे दाबून पाठवण्यात आली आहेत, असे बचाव अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (Uttarkashi Tunnel Collapse)
पाईपलाइन मदतकार्यात अत्यंत उपयुक्त ठरत आहे
बोगद्याच्या आतील ही पाइपलाइन मदत आणि बचाव कार्यात अत्यंत उपयुक्त ठरत आहे. कामगारांशी संवाद प्रस्थापित करण्याचे कामही या पाइपलाइनद्वारे केले जात आहे. यापूर्वी बोगद्यात अडकलेल्या मजुराला निरोप देण्यासाठी कागदावर लिहिलेल्या संदेशाची स्लिप पाइपलाइनद्वारे पाठवण्यात आली होती. त्यानंतर हरभऱ्याची पाकिटेही याच पाइपलाइनद्वारे पाठवण्यात आली असल्याची माहिती बचाव अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा:

Uttarkashi Tunnel Collapse : जगण्याची लढाई युद्धपातळीवर : बोगद्यात अडकलेले सर्व ४० मजूर सुरक्षित
Landslide In Uttarkashi: उत्तरकाशीत बोगद्यात भूस्खलन; ३६ हून अधिक कामगार अडकल्याची भीती

The post आम्ही सुरक्षित आहोत : बोगद्यात अडकलेल्या मजुरांनी दिला प्रतिसाद appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमध्ये सिल्क्यारा ते दंडलगाव मार्गावरील एका बोगद्याचे काम सुरू आहे. रविवारी (दि.१२) बोगद्याचा काही भाग कोसळला होता. बोगद्यात भूस्खलन झालेल्या पुढच्या भागात ४० हून अधिक मजूर अडकले आहेत. आज (दि.१३) दुसऱ्या दिवशीही युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते. दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या मजुरांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क साधण्यात आला असून, “आम्ही सुरक्षित आहोत” असा प्रतिसाद मिळाला …

The post आम्ही सुरक्षित आहोत : बोगद्यात अडकलेल्या मजुरांनी दिला प्रतिसाद appeared first on पुढारी.

Go to Source