छ.संभाजीनगर: टाकळी अंबड येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, बैल दगावले

पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज (दि. १२) दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली.  टाकळी अंबड (घेवरी) येथे एक शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. सुधाकर धोंडीराम पाचे (वय ६०, रा. टाकळी अंबड (घेवरी) ता.पैठण) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तर  विहामांडवा, इंदेगाव परिसरात वीज पडल्याने बैल दगावले आहेत. पैठण शहरासह ग्रामीण भागातील नांदर, … The post छ.संभाजीनगर: टाकळी अंबड येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, बैल दगावले appeared first on पुढारी.

छ.संभाजीनगर: टाकळी अंबड येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, बैल दगावले

पैठण, Bharat Live News Media वृत्तसेवा: पैठण तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज (दि. १२) दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली.  टाकळी अंबड (घेवरी) येथे एक शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. सुधाकर धोंडीराम पाचे (वय ६०, रा. टाकळी अंबड (घेवरी) ता.पैठण) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तर  विहामांडवा, इंदेगाव परिसरात वीज पडल्याने बैल दगावले आहेत.
पैठण शहरासह ग्रामीण भागातील नांदर, विहामांडवा, इंदेगाव आदी ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस जोरदार कोसळला.  अंबड (घेवरी) येथे सुधाकर पाचे बकऱ्या चारीत असताना  त्यांच्या अंगावर वीज पडून ते  गंभीर जखमी झाले. त्यांना पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. तर विहामांडवा येथील अंकुश एकनाथ निंबाळकर, त्रिंबक एकनाथ निंबाळकर या भावांचे दोन बैल वीज पडून दगावले. इंदेगाव येथे देखील एक बैल दगावला.  नांदर परिसरात वाहनावर झाड पडल्याने नुकसान झाले. विहामांडवा – शहागड रोडवर बाभळीचे झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. टाकळी अंबड येथील तलाठी सुवर्णा नाटकर यांनी शेतकऱ्यासह जनावराचा मृत्यू झालेल्या घटनास्थळी जाऊन पाहणी करून तातडीने पंचनामा केला.
 हेही वाचा 

छ.संभाजीनगर: येसगावजवळ छोटा हत्ती – दुचाकीच्या धडकेत तरुण ठार, १ जण जखमी
छ. संभाजीनगर : सोयगावात उपचाराअभावी मुलीचा मृत्यू ; पाठोपाठ हतबल पित्यानेही संपविले जीवन
छ. संभाजीनगर : ८ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी वैजापूरच्या रोजगार सेवकासह अभियंत्याविरोधात गुन्हा

Latest Marathi News छ.संभाजीनगर: टाकळी अंबड येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, बैल दगावले Brought to You By : Bharat Live News Media.