सांगलीत काँग्रेसच्या विशाल पाटलांची बंडखोरी! अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Election 2024 : सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसचे नेते विशाल पाटील ठाम आहेत. त्यामुळे ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समोर आले आहे. ते सोमवारी अर्ज भरतील अशी माहितीही मिळते आहे. या राजकीय भूकंपानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना … The post सांगलीत काँग्रेसच्या विशाल पाटलांची बंडखोरी! अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार appeared first on पुढारी.

सांगलीत काँग्रेसच्या विशाल पाटलांची बंडखोरी! अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Election 2024 : सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसचे नेते विशाल पाटील ठाम आहेत. त्यामुळे ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समोर आले आहे. ते सोमवारी अर्ज भरतील अशी माहितीही मिळते आहे. या राजकीय भूकंपानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित झाल्यापासून सांगलीच्या राजकारणात खळबळ माजली आहे. काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य सुरू आहे. सांगली काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी थेट दिल्ली गाठून काँग्रेस पक्षाच्या हायकमांडपर्यंत आपले गा-हाणे मांडले. असे असताना देखील महाविकास आघाडी द्वारा झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला गेल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सांगलीतील स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत. त्यातच शुक्रवारी (दि. 12) विशाल पाटील यांच्या स्वीय सहायकाने विशाल पाटील यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडे वारंवार उमेदवारी मागणारे विशाल पाटील हे बंडखोरी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशाल पाटील हे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवणार आहेत. असे असले तरी देखील काँग्रेसकडून तिकीट मागण्यावर देखील ते अद्याप ठाम आहेत, असेही सांगण्यात येत आहे.
विशाल पाटील हे शुक्रवारीच अर्ज दाखल करणार होते. परंतु तांत्रिक कारणामुळे ते सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. सांगलीची जागा ही ठाकरे गटाकडे गेल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी हे प्रचंड नाराज आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक लढायची असा निर्धारच काँग्रेस पदाधिकारी यांनी केला आहे.
विशाल पाटील यांच्याविषयी मोठी सहानुभूती
उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील सभेत महाविकास आघाडीतर्फे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे अनेकांचा अपेक्षाभंग झाला. लढत निकराची व्हायची असेल तर विशाल हेच विरोधी उमेदवार असले पाहिजेत, अशी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांची धारणा आहे. काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते विशाल यांनी निवडणूक लढवावी, यासाठी आग्रही आहेत. उमेदवारी डावलल्यावरून मतदारांमध्ये विशाल पाटील यांच्याविषयी मोठी सहानुभूती आहे.
Latest Marathi News सांगलीत काँग्रेसच्या विशाल पाटलांची बंडखोरी! अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार Brought to You By : Bharat Live News Media.