नाशिकच्या सिडकोत टिपू सुलतानचा बॅनर झळकल्याने खळबळ

सिडको : पुढारी वृत्तसेवा- मालेगाव येथे नमाजपठणावेळी पॅलेस्टाइनचा झेंडा फडकावल्याची घटना ताजी असतानाच, नाशिकच्या सिडको परिसरात टिपू सुलतानचा बॅनर झळकल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बॅनर हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आलेले आहे. अशातच … The post नाशिकच्या सिडकोत टिपू सुलतानचा बॅनर झळकल्याने खळबळ appeared first on पुढारी.

नाशिकच्या सिडकोत टिपू सुलतानचा बॅनर झळकल्याने खळबळ

सिडको : Bharat Live News Media वृत्तसेवा- मालेगाव येथे नमाजपठणावेळी पॅलेस्टाइनचा झेंडा फडकावल्याची घटना ताजी असतानाच, नाशिकच्या सिडको परिसरात टिपू सुलतानचा बॅनर झळकल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बॅनर हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आलेले आहे. अशातच एका बॅनरची चर्चा शुक्रवारी (दि. १२) रंगली व खळबळही निर्माण झाली होती. परिसरातील पाटील गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व टिपू सुलतान यांचा एकत्रित फोटो लावण्यात आला होता. त्यावर डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. याबाबत माहिती समजताच पोलिसांना तत्काळ घटनास्थळी जाऊन बॅनर हटवला. तसेच या घटनेबाबत संबंधित व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अंबड पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी दिली.
हेही वाचा :

Pushpa 2 चा टीजर इतका खास का आहे? ६० कोटीत शूट झाला ६ मिनिटांचा सीन
Nashik Onion Auction | आठ दिवसांनंतर कांदा लिलाव पूर्ववत, ७४ व्यापाऱ्यांना परवाने
वेटींगवरील तिकिट रद्द करण्यासाठी आकारलेल्या शुल्कातून रेल्वेची ३ हजार कोटींहून अधिक कमाई

Latest Marathi News नाशिकच्या सिडकोत टिपू सुलतानचा बॅनर झळकल्याने खळबळ Brought to You By : Bharat Live News Media.