माढ्याचा उमेदवार मोहिते पाटील कुटुंबातीलच: शरद पवार

बारामती : पुढारी वृत्तसेवा : माढा मतदारसंघातील अनेक लोक मला भेटले. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून मोहिते पाटील यांचे नाव पुढे आले आहे. येत्या दोन दिवसात धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रवेश होईल. त्यानंतर पक्षाकडून उमेदवारीची अधिकृत घोषणा होईल, असे सांगत माढ्याचा उमेदवार मोहिते पाटील घरातीलच असेल असे स्पष्ट संकेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिले. बारामतीत ते … The post माढ्याचा उमेदवार मोहिते पाटील कुटुंबातीलच: शरद पवार appeared first on पुढारी.

माढ्याचा उमेदवार मोहिते पाटील कुटुंबातीलच: शरद पवार

बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : माढा मतदारसंघातील अनेक लोक मला भेटले. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून मोहिते पाटील यांचे नाव पुढे आले आहे. येत्या दोन दिवसात धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रवेश होईल. त्यानंतर पक्षाकडून उमेदवारीची अधिकृत घोषणा होईल, असे सांगत माढ्याचा उमेदवार मोहिते पाटील घरातीलच असेल असे स्पष्ट संकेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिले.
बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. Madha Lok Sabha
पवार म्हणाले की, माढ्यासंबंधीचा आमचा विचार सुरु आहे. काही प्रस्ताव आले आहेत. गुरुवारी माळशिरस, अकलूज भागातील अनेक सहकारी भेटले. त्यांनी धैर्य़शील यांचे नाव दिलेले आहे. यासंबंधीचा निर्णय येत्या एक दोन दिवसांत होईल. पक्षाचे अध्यक्ष व काही वरिष्ठ नेते अकलुजला जातील. पहिल्यांदा पक्ष प्रवेश होईल. पक्ष प्रवेश झाल्याशिवाय उमेदवारी जाहीर करता येत नाही. ती जाहीर करण्याची जबाबदारी आम्हा लोकांवर आहे. त्या मतदारसंघात तरुणांचा, वडीलधाऱ्यांचा मोठा पाठिंबा दिसत आहे. आम्हा सर्वांसमोर आलेल्या मतामध्ये मोहिते पाटील यांच्या नावाला अनुकुलता दिसत आहे. पक्ष प्रवेशानंतर उमेदवारी जाहीर करत प्रचार मोहीम सुरु करू. Madha Lok Sabha
Madha Lok Sabha साताऱ्यात राजा विरुद्ध सामान्य कार्यकर्ता
साताऱ्याच्या जागेचा आमचा उमेदवार पक्षाच्या अध्यक्षांनी जाहीर केला आहे. तिथे शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तेथे एका बाजूने राजा तर दुसऱ्या बाजूने माथाडी कामगार म्हणून काम केलेला सर्वसामान्य कुटुंबातील पण कर्तृत्ववान कार्यकर्ता अशी निवडणूक होईल. लवकरच तेथे अर्ज दाखल होतील, असे शरद पवार म्हणाले.
हेही वाचा 

Loksabha election : माढा लोकसभा मतदारसंघात काका-पुतणे आमने-सामने?
Lok Sabha Election 2024 | सोलापूर : माढा लोकसभा मोहिते-पाटील लढविणारच
Sharad Pawar | माढातून लोकसभा निवडणूक लढणार का?; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Latest Marathi News माढ्याचा उमेदवार मोहिते पाटील कुटुंबातीलच: शरद पवार Brought to You By : Bharat Live News Media.