नाही म्हणजे नाही! नावडत्या गोष्टी करायला नकार कसा द्यावा?

काही वेळा असं होतं, की एखादी गोष्ट आवडत नसते, पटत नसते, रुचत नसते. आतून कुठेतरी वाटत असतं, आपला विरोध दर्शवावा, नकार सांगावा अगदी स्वच्छ शब्दांत, न घाबरता, न बावचळता, विनाकारण भीड न बाळगता! स्पष्टपणे दुसर्‍याला समजेल अशा पद्धतीने थेट ‘नाही’ म्हणावं! पण, कितीही वाटत असलं, तरी आपल्यातल्या अनेक जणींना ते जमत नाही. संबंधित बातम्या  Kasturi … The post नाही म्हणजे नाही! नावडत्या गोष्टी करायला नकार कसा द्यावा? appeared first on पुढारी.

नाही म्हणजे नाही! नावडत्या गोष्टी करायला नकार कसा द्यावा?

काही वेळा असं होतं, की एखादी गोष्ट आवडत नसते, पटत नसते, रुचत नसते. आतून कुठेतरी वाटत असतं, आपला विरोध दर्शवावा, नकार सांगावा अगदी स्वच्छ शब्दांत, न घाबरता, न बावचळता, विनाकारण भीड न बाळगता! स्पष्टपणे दुसर्‍याला समजेल अशा पद्धतीने थेट ‘नाही’ म्हणावं! पण, कितीही वाटत असलं, तरी आपल्यातल्या अनेक जणींना ते जमत नाही.
संबंधित बातम्या 

Kasturi Club : कस्तुरींच्या आनंदमेळ्यामध्ये रंगणार बहारदार लावणी..
Kasturi Club : तिमिरातूनी तेजाकडे; मंगलमय वातावरणात उजळले दीप
Pudhari Kasturi Club : कस्तुरी लुटणार दांडिया-गरबाचा आनंद; नवरात्रोत्सवानिमित्त उद्या खास उपक्रम

आपल्या मनाचा आणि आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा विचार बाजूला ठेवून आपण नकार दिला, तर कुणाला काय वाटेल, यालाच अनेक जणी प्राधान्य देतात. दुसरीकडे, एखादी मुलगी किंवा महिला जेव्हा ‘नाही’ म्हणते तेव्हा तिला नकार नाही, तर होकार द्यायचा असतो, असाही एक समज रूढ झालेला आहे. पण, ‘नाही’ याचा अर्थ ‘नाही’ असाच असतो; मग ते ‘नाही’ पुरुषाने म्हणलेलं असो वा स्त्रीने!
एखाद्या नात्याला किंवा प्रस्तावाला होकार देणं जसं महत्त्वाचं तसंच आपल्याला नकोशा वाटणार्‍या विचाराला, कृतीला नकार देणंही तितकंच महत्त्वाचं असतं. विशेषत: खूप जवळच्या नात्यांमध्ये किंवा प्रेमामध्ये तुमचा नकार तुम्हाला अतिशय स्पष्टपणे सांगावा लागतो. तुम्ही नकार दिलात, तर त्याचे नक्कीच काही परिणाम होतील. पण नको त्या प्रसंगात अडकण्यापेक्षा त्या परिणामाचा हिमतीने मुकाबला करणं कधीही चांगलं. योग्य वेळी योग्य पद्धतीने नकार देणं हे सवयीने जमू शकतं. शांतपणे पण स्पष्टपणे ‘नाही’ म्हणण्यासाठी पुढील युक्त्या वापरून सरावदेखील करता येतो.
न लाजता, न घाबरता स्पष्ट शब्दात सांगा – नाही म्हणजे नाही! आपला नकार लिहून काढा आणि संबंधित व्यक्तीला द्या. शांतपणे, स्पष्टपणे सांगा – ‘मला नाही वाटत, मला हे जमेल.’ किंवा ‘मला जरा विचार करावा लागेल.’ किंवा ‘नाही, मला आवडणार नाही.’
सराव करून हे जमू शकतं, याचा विश्वास बाळगा. आवडीच्या गोष्टी आवर्जून करणं जसं गरजेचं, तसंच नावडत्या गोष्टी करायला नकार देणं हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, हे कायम लक्षात ठेवा.
Latest Marathi News नाही म्हणजे नाही! नावडत्या गोष्टी करायला नकार कसा द्यावा? Brought to You By : Bharat Live News Media.