हिंगोली: हळदीचे दर १ हजारांनी गडगडले; उत्पादक शेतकर्‍यांमध्ये चलबिचल

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात हळदीसाठी ओळखल्या जाणार्‍या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात शुक्रवारी (दि.१२)  तब्बल 15 हजार क्‍विंटल हळदीची आवक झाली. परंतू मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या दरात तब्बल 1 हजार रूपयांची घट झाल्याने हळद उत्पादक शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी हळदीला कमीत कमी 12 हजार 500 तर जास्तीत जास्त 14 हजार … The post हिंगोली: हळदीचे दर १ हजारांनी गडगडले; उत्पादक शेतकर्‍यांमध्ये चलबिचल appeared first on पुढारी.

हिंगोली: हळदीचे दर १ हजारांनी गडगडले; उत्पादक शेतकर्‍यांमध्ये चलबिचल

हिंगोली: Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठवाड्यात हळदीसाठी ओळखल्या जाणार्‍या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात शुक्रवारी (दि.१२)  तब्बल 15 हजार क्‍विंटल हळदीची आवक झाली. परंतू मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या दरात तब्बल 1 हजार रूपयांची घट झाल्याने हळद उत्पादक शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी हळदीला कमीत कमी 12 हजार 500 तर जास्तीत जास्त 14 हजार 800 रूपयांचा दर मिळाला. Hingoli News
सांगलीनंतर हिंगोलीची बाजारपेठ हळदीसाठी मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. येथील मोंढ्यात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यासह विदर्भातून हळद विक्रीसाठी येते. मागील महिन्याभरापासून हळदीची आवक वाढली आहे. पंधरा दिवसांपुर्वी हळदीला 19 हजार रूपयांपर्यंत दर मिळाला होता. परंतू मध्यंतरी काही दिवस मोंढ्यातील व्यवहार बंद राहिले. शुक्रवारी हळदीची खरेदी-विक्री सुरू झाली. गुरूवारी रात्रीपासूनच वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास 400 पेक्षा अधिक वाहने दाखल झाली. पंधरा हजार क्‍विंटल हळदीची आवक झाल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. शुक्रवारी दर्जेदार हळदीच्या कांडीला 14 हजार 800 रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला तर कमीत कमी 12 हजार 500 रूपयांपर्यंत हळद विकल्या गेली. मागील पाच वर्षात यंदा हळदीला समाधानकारक दर मिळत असल्याने उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. Hingoli News
परंतू 15 दिवसात जवळपास अडीच हजार पेक्षा अधिक रूपयांनी हळदीच्या दरात घट झाल्याने हळद उत्पादक शेतकरी संभ्रमात पडले आहेत. त्यातच येथील मोंढा महिन्यात केवळ दहा ते पंधरा दिवसच सुरू राहत असल्याने हळद विक्रीसाठी शेतकर्‍यांना तीन ते चार दिवस मोंढ्यात मुक्‍काम करावा लागत आहे. परिणामी शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
Hingoli News तीन दिवस चालणार काटा
येथील मोंढ्यात हळदीची विक्रमी आवक होत आहे. सध्या पंधरा हजार क्‍विंटल हळदीची आवक झाली आहे. दररोज केवळ पाच हजार क्‍विंटल हळदीचा काटा होत आहे. त्यामुळे 15 हजार क्‍विंटल हळदीचा काटा करण्यासाठी तीन दिवस लागणार आहेत. पुन्हा रामनवमी व मतदानाची सुट्टी राहणार असल्याने मे च्या पहिल्या आठवड्यात हळदीची आवक वाढणार असल्याने दर कोसळण्याची भीती व्यक्‍त होऊ लागली आहे.
हेही वाचा 

हिंगोली : कळमनुरी शहरात डीजे वाजविण्यावरून वाद
हिंगोली: वारंगा बाळापूर, डोंगरकडा परिसरात अवकाळीने पिकांचे नुकसान
हिंगोली: सेनगाव येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी खरेदी- विक्री व्यवहार बंद पाडला

Latest Marathi News हिंगोली: हळदीचे दर १ हजारांनी गडगडले; उत्पादक शेतकर्‍यांमध्ये चलबिचल Brought to You By : Bharat Live News Media.