यशोगाथा ! चाचर कुटुंबाने घेतले उसाचे विक्रमी उत्पादन

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील मावडी कडेपठार येथील प्रगतशील शेतकरी आकाश हनुमंतराव चाचर व कुलदीप हनुमंतराव चाचर यांनी को-86032 या उसाचे चालू गळीत हंगामात विक्रमी उत्पादन घेतले आहे. या उसाची उंची साधारण 16 ते 17 फूट आहे व उसातील कांड्यांची संख्या 32 ते 34 आहे. यामध्ये एकरी 85 ते 90 टन उत्पादन मिळाले … The post यशोगाथा ! चाचर कुटुंबाने घेतले उसाचे विक्रमी उत्पादन appeared first on पुढारी.

यशोगाथा ! चाचर कुटुंबाने घेतले उसाचे विक्रमी उत्पादन

जेजुरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील मावडी कडेपठार येथील प्रगतशील शेतकरी आकाश हनुमंतराव चाचर व कुलदीप हनुमंतराव चाचर यांनी को-86032 या उसाचे चालू गळीत हंगामात विक्रमी उत्पादन घेतले आहे. या उसाची उंची साधारण 16 ते 17 फूट आहे व उसातील कांड्यांची संख्या 32 ते 34 आहे. यामध्ये एकरी 85 ते 90 टन उत्पादन मिळाले आहे. या उसाच्या उत्पादनासाठी जमिनीची योग्य मशागत, शेणखताचा वापर, आवश्यक खते आणि औषधांच्या फवारण्या, पाण्याची उपलब्धता तसेच योग्य नियोजन आणि देखभालीमुळे उसाची उत्पादकता वाढल्याचे प्रगतशील शेतकरी आकाश चाचर व कुलदीप चाचर यांनी सांगितले.
या उसाच्या उत्पादनासाठी जयश्री चाचर तसेच श्रीसोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर्यन यादव, ऊस विकास अधिकारी विराज निंबाळकर, अ‍ॅग्रीहोश्चर उज्ज्वल पवार, चीटबॉय आनंदा पाटोळे, संदीप मोटे, कृषी सहायक स्नेहल जाधव यांनी मार्गदर्शन केल्याचे शेतकरी आकाश चाचर यांनी सांगितले. उसाच्या विक्रमी उत्पादनाबद्दल परिसरातील शेतकर्‍यांकडून चाचर कुटुंबीयांचे अभिनदंन होत आहे. या वेळी शेतात भाऊसो गायकवाड, दिलीपअण्णा भामे, महेंद्र भामे, विकास चाचर, कुलदीप चाचर, बाळासो उसरे आदी उपस्थित होते.
हेही वाचा

जलसंकटाच्या झळा ! कुणी पाणी देता का पाणी..! आंबेगावच्या जनतेचा टाहो
निजामपूर-जैताणे येथे ईद- उल-फितर उत्साहात
प्रकल्पग्रस्ताचे बनावट प्रतिज्ञापत्र सादर करणार्‍यावर गुन्हा..

Latest Marathi News यशोगाथा ! चाचर कुटुंबाने घेतले उसाचे विक्रमी उत्पादन Brought to You By : Bharat Live News Media.