निवडणुकीच्या आधी पोलिसांची अॅक्शन, लाखोंचे मद्य जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात १६ मार्च पासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे अवैध धंदे, गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी बंदोबस्तासह कारवाईचे नियोजन केले आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी १६ मार्च ते १० एप्रिल या कालावधीत ७९९ लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. शहर पोलिसांनी लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. … The post निवडणुकीच्या आधी पोलिसांची अॅक्शन, लाखोंचे मद्य जप्त appeared first on पुढारी.

निवडणुकीच्या आधी पोलिसांची अॅक्शन, लाखोंचे मद्य जप्त

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा-लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात १६ मार्च पासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे अवैध धंदे, गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी बंदोबस्तासह कारवाईचे नियोजन केले आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी १६ मार्च ते १० एप्रिल या कालावधीत ७९९ लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला आहे.
शहर पोलिसांनी लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार सराईत गुन्हेगारांची धरपकड करणे, अवैध धंद्यावर कारवाई करणे, अवैध मद्यविक्री-साठा- वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करणे, शस्त्रे बाळगणाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. यात पोलिसांनी ४३४ लिटर देशी व ३६५ लिटर विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. या मद्यसाठ्याची किंमत ४ लाख २२ हजार १६० रुपये इतकी आहे. याप्रकरणी पोलिसांनी ६४ गुन्हे दाखल केले आहेत.
त्याचप्रमाणे अवैध शस्त्रे बागळल्याप्रकरणी ३९ गुन्हे दाखल असून त्यात सुमारे ४० संशयितांची धरपकड पोलिसांनी केली आहे. या संशयितांकडून गावठी कट्टे व धारदार शस्त्रे अशी एकूण ५१ शस्त्रे जप्त केली आहेत. तर अंमली पदार्थ व गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधातही पोलिसांनी १० गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणी संशयितांकडून लाखाे रुपयांचा अंमली पदार्थ व गुटख्याचा साठा जप्त केला आहे.
अशी केली कारवाई
– अवैध मद्यविक्री-साठा प्रकरणी ६४ गुन्हे दाखल आहेत.
– ८ देशी कट्टे व १९ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी सात गुन्हे दाखल आहेत.
– ४३ धारदार शस्त्रे पोलिसांनी जप्त केली असून याप्रकरणी ३२ गुन्हे दाखल आहेत.
– अंमली पदार्थ बागळल्याप्रकरणी पाच गुन्हे दाखल, लाखो रुपयांचा अंमली साठा जप्त.
– प्रतिबंधित गुटखा साठा-विक्री केल्याप्रकरणी ५ गुन्हे दाखल केले आहेत.
गुन्हेगारांवर नियमीत कारवाई सुरु आहे. गस्त, नाकाबंदी, खबऱ्यांकडील माहितीच्या आधारे पाेलिसांकडून कारवाई केली जात आहे. त्यात अवैध धंदेचालक, शस्त्र बागळणारे, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची धरपकड केली जात आहे. गुन्हेगारांना समन्स बजावले जात आहे. यापुढील दिवसांत ही कारवाई अधिक तीव्र होणार असून गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक स्वरुपाची कारवाई देखील केली जाात आहे.- प्रशांत बच्छाव, पोलिस उपआयुक्त, गुन्हे शाखा
हेही वाचा ;

परभणी : अवकाळी पावसाने घरे जमिनदोस्त; फळबागांचीही प्रचंड नासाडी
अजब कारभार ! वर्गखोल्यांचे काम निकृष्ट; नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी

Latest Marathi News निवडणुकीच्या आधी पोलिसांची अॅक्शन, लाखोंचे मद्य जप्त Brought to You By : Bharat Live News Media.