
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : रिॲलिटी शो विजेता, अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकीने (Munawar Faruqui) आपल्या पहिल्या वेब सीरीजची घोषणा केली आहे. या सीरीजचे नाव ‘फर्स्ट कॉपी’ आहे. सोशल मीडियावर या वेब सीरीजचा टीजरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. मुनव्वर या वेब सीरीजच्या माध्यमातून अभिनयाच्या विश्वात पाऊल ठेवणार आहे. (Munawar Faruqui)
मुनव्वरने शेअर केला ‘फर्स्ट कॉपी’ टीजर
मुनव्वरने टीजर शेअर करत कॅप्शनमध्ये आपल्या फॅन्सना ‘ईद मुबारक’ असे लिहिले आहे. एका मिनिटात ४३ सेकंदाच्या या टीजरमध्ये मुनव्वर १९९९ मध्ये घेऊन जातो, जेव्हा DVD चा जमाना असायचा. दरम्यान, टीजरमध्ये मुनव्वर म्हणताना दिसतो की, त्यावेळी बॉलिवूड बंदुकीपेक्षा डीव्हीडीला जास्त घाबराचे.
मुनव्वर पुढे म्हणतो की, पब्लिक फ्रत्येक शुक्रवारची प्रतीक्षा करत नाही. यासाठी आधीपासून चित्रपटाच्या ‘कॉपी’ बनवत आहे…त्यांना चित्रपट वेळेआधी दाखवू शकू.
या वेब सीरीजमध्ये मुनव्वर पायरेसीच्या जगाच्या बादशाहची भूमिका साकारत आहे. त्याची भूमिका ग्रे आहे.
View this post on Instagram
A post shared by Munawar Faruqui (@munawar.faruqui)
View this post on Instagram
A post shared by Munawar Faruqui (@munawar.faruqui)
Latest Marathi News मुनव्वर फारूकीच्या ‘फर्स्ट कॉपी’ वेब सीरीजचा टीजर रिलीज (Video) Brought to You By : Bharat Live News Media.
