Kiss वरून वाद २० वर्षांनंतर संपुष्टात; इमरान हाश्मी-मल्लिका शेरावत पुन्हा आले एकत्र (Video)

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : इमरान हाश्मी-मल्लिका शेरावत यांच्यातील २० वर्षांपूर्वीचा वाद संपुष्टात आला आहे. २० वर्षांनी मर्डर चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी इमरान – मल्लिका यांच्यात भांडण झाले होते. अखेर हे भांडण विसरून दोघांनी पुन्हा मैत्री केली आहे. इमरान- मल्लिकाने एकमेकांना आलिंगन देत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. (Emraan Hashmi-Mallika Sherawat) निर्माते आनंद पंडित यांच्या मुलीच्या रिसेप्शनमध्ये इम्रान आणि मल्लिका पोहोचले. दोघे गुरुवारी मुंबईमध्ये वेडिंग रिसेप्शनमध्ये भेटले. दोघांनी एकत्र रेड कार्पेटवर पोज देखील दिले. (Emraan Hashmi-Mallika Sherawat)
इमरान हाश्मी – मल्लिका शेरावत वेडिंग रिसेप्शनमध्ये एकमेकांना पाहून हसले. त्यानंतर दोघांनी आलिंगन दिलं.
फॅन्सनी दिली कॉमेंट
इम्रान आणि मल्लिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅन्स खूप साऱ्या कॉमेट्स देताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले- ती स्टनिंग दिसत आहे. मला आजदेखील वाटते की, त्यांचे मैया मैया गाणे एपिक होतं. दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं- बेस्ट पेयर. आणखी एका युजरने लिहिलं- इमरान ब्लश करत आहे.
video-Voompla instagram वरून साभार
View this post on Instagram
A post shared by Voompla (@voompla)
Latest Marathi News Kiss वरून वाद २० वर्षांनंतर संपुष्टात; इमरान हाश्मी-मल्लिका शेरावत पुन्हा आले एकत्र (Video) Brought to You By : Bharat Live News Media.
