Pakistan Crime | गरिबीने पिचलेल्या कामगाराने ७ मुलांसह बायकोची केली हत्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानातील पंजाब प्रांतात एका गरीब कामगाराने पोटची ७ मुले आणि बायकोची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली आहे. ही घटना मुझफ्फरनगर जिल्ह्यातील अलीपूर या गावात घडली आहे. पोलिसांनी या कामगाराला अटक केली आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत खालवली असल्याने, मुलांचे पोषण करणार कसे या विवंचनेतून सज्जाद खोकर या कामगाराने हे टोकाचे पाऊल उचलले. … The post Pakistan Crime | गरिबीने पिचलेल्या कामगाराने ७ मुलांसह बायकोची केली हत्या appeared first on पुढारी.

Pakistan Crime | गरिबीने पिचलेल्या कामगाराने ७ मुलांसह बायकोची केली हत्या

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानातील पंजाब प्रांतात एका गरीब कामगाराने पोटची ७ मुले आणि बायकोची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली आहे. ही घटना मुझफ्फरनगर जिल्ह्यातील अलीपूर या गावात घडली आहे. पोलिसांनी या कामगाराला अटक केली आहे.
आर्थिक परिस्थिती अत्यंत खालवली असल्याने, मुलांचे पोषण करणार कसे या विवंचनेतून सज्जाद खोकर या कामगाराने हे टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांसमोर सज्जादने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मुलांचे पोषण करण्याइतपत परिस्थिती नसल्याने मुलांची आणि बायकोची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या ७ मुलांत ४ मुली आणि ३ मुलगे आहेत. सर्वांत लहान मुलाचे वय ८ महिने तर मोठ्या मुलीचे वय १० वर्ष होते.
पाकिस्ताना सध्या गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. पाकिस्तानने जागतिक नाणेनिधीकडे अर्थसहाय मागितले आहे. पाकिस्तानच्या बिकट आर्थिक परिस्थितीची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचे या घटनेतून दिसत आहे.
हेही वाचा 

Nashik Crime | माहेरून दोन लाख रुपये आणत नाही म्हणून विवाहितेचा छळ, पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime News : ‘त्या’ कामगार मृत्यूप्रकरणी पाच जणांवर गुन्हा..

Nagpur Crime News :’लिव्ह इन’मधून महिलेचा खून, झाडावर मृतदेह लटकावून रचला बनाव

Latest Marathi News Pakistan Crime | गरिबीने पिचलेल्या कामगाराने ७ मुलांसह बायकोची केली हत्या Brought to You By : Bharat Live News Media.