द. मद्यविक्रेत्याने केजरीवालांची भेट घेतली, तेव्हा के. कविता संपर्क साधतील: CBI चा खळबळजनक दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तिहार तुरुंगात असलेल्या भारत राष्ट्र समितीच्‍या (BRS) नेत्‍या के कविता यांना दिल्ली दारू धोरण घोटाळा संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काल ( दि. ११ एप्रिल) अटक केली. त्यानंतर आज (दि.१२) त्यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात आणण्यात आले. सीबीआयने बीआरएस नेते के. कविताला पाच दिवसांची कोठडी देण्याची मागणी करणारा अर्ज … The post द. मद्यविक्रेत्याने केजरीवालांची भेट घेतली, तेव्हा के. कविता संपर्क साधतील: CBI चा खळबळजनक दावा appeared first on पुढारी.

द. मद्यविक्रेत्याने केजरीवालांची भेट घेतली, तेव्हा के. कविता संपर्क साधतील: CBI चा खळबळजनक दावा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तिहार तुरुंगात असलेल्या भारत राष्ट्र समितीच्‍या (BRS) नेत्‍या के कविता यांना दिल्ली दारू धोरण घोटाळा संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काल ( दि. ११ एप्रिल) अटक केली. त्यानंतर आज (दि.१२) त्यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात आणण्यात आले. सीबीआयने बीआरएस नेते के. कविताला पाच दिवसांची कोठडी देण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे. परंतु न्यायालयाने सीबीआयच्या याचिकेवर दिल्ली न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी आज (दि.१२) दुपारी २ वाजता होणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. (K Kavitha)
दक्षिणेतील एका मद्य व्यावसायिकाने घेतली केजरीवालांची भेट
दिल्ली राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनीवणी दरम्यान सीबीआयने असा युक्तिवाद केला आहे की दक्षिणेतील एका मद्य व्यावसायिकाने अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. दिल्लीत व्यवसाय करण्यासाठी त्यांचा पाठिंबा मागितला. आणि के कविता त्यांच्याशी संपर्क साधतील असे आश्वासन दिले. आमच्याकडे पुरेसे साहित्य, व्हॉट्सॲप चॅट्स आणि संबंधित आरोपींचे जबाब आहेत, असे देखील सीबीआयने म्हटले आहे. (K Kavitha)

#UPDATE | CBI moves an application seeking five days custodial remand of BRS leader K Kavitha. https://t.co/tz0zMkpwge
— ANI (@ANI) April 12, 2024

K Kavitha: के. कविताची इंडोस्पिरिट्समध्ये भागीदारी
सरकारी साक्षीदार दिनेश अरोरा यांनी आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले आहे की, अभिषेक बोईनपल्ली यांनी विजय नायरला 100 कोटी रुपये दिल्याचे सांगितले. CrPC च्या कलम 161 आणि 164 अंतर्गत हवाला ऑपरेटरचे स्टेटमेंट 11.9 कोटी रुपयांच्या पेमेंटची पुष्टी करते. बुचीबाबूंच्या चॅटवरून कळते की, के. कविताची इंडोस्पिरिट्समध्ये भागीदारी होती. आरोपी मनीष सिसोदिया यांच्या दबावामुळे काळ्या यादीत टाकल्यानंतरही इंडोस्पिरिटला परवाने देण्यात आल्याचा दावा देखील सीबीआयने केला आहे. (K Kavitha)
के.कविता तथ्ये लपवत आहेत- CBI चा आरोप
सीबीआयने पुढे बीआरएस नेत्या के कविता त्यांच्या माहितीत असलेली तथ्ये लपवत आहेत, सहकार्य करत नाहीत असा आरोप देखील त्यांच्यावर केला आहे. यापूर्वी नोटीस देऊनही त्या अनेकवेळा तपासास हजर झाल्या नाहीत. सीबीआयच्या सरकारी वकिलांना त्यांची चौकशी करायची आहे, त्यामुळे के.कविता यांची ५ दिवसांची कोठडी हवी आहे, अशी मागणी केंद्रीय अन्वेषण विभागाने कोर्टाकडे केली आहे.
हे ही वाचा: 

K Kavitha: BRS नेत्या के कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत 23 एप्रिलपर्यंत वाढ
K Kavitha News: के. कविता यांना दिलासा नाहीच, जामीन अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला
K Kavitha News: ‘हे मनी लॉन्ड्रिंग नाही तर राजकीय लॉन्ड्रिंग’; के. कविता यांचा सत्ताधारी, ईडीवर हल्लाबोल

Latest Marathi News द. मद्यविक्रेत्याने केजरीवालांची भेट घेतली, तेव्हा के. कविता संपर्क साधतील: CBI चा खळबळजनक दावा Brought to You By : Bharat Live News Media.