तब्बल ५५ वर्षानंतर शरद पवार जाणार काकडे कुटुंबाच्या भेटीला..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बारामतीच्या आणि राज्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी असलेल्या काकडे कुटुंबाच्या घरी खासदार शरद पवार आज भेट देणार आहेत. शरद पवार यांचे प्रतिस्पर्धी असणारे कै,संभाजीराव काकडे, कै. बाबालाल काकडे यांच्या कुटुंबीयांना ते भेटणार आहेत. मुंबई फेडरेशनचे उपाध्यक्ष शामराव काकडे यांच्या निवासस्थानी शरद पवार थोड्याच वेळात भेट देणार आहेत. माजी खासदार संभाजी … The post तब्बल ५५ वर्षानंतर शरद पवार जाणार काकडे कुटुंबाच्या भेटीला.. appeared first on पुढारी.

तब्बल ५५ वर्षानंतर शरद पवार जाणार काकडे कुटुंबाच्या भेटीला..

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : बारामतीच्या आणि राज्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी असलेल्या काकडे कुटुंबाच्या घरी खासदार शरद पवार आज भेट देणार आहेत. शरद पवार यांचे प्रतिस्पर्धी असणारे कै,संभाजीराव काकडे, कै. बाबालाल काकडे यांच्या कुटुंबीयांना ते भेटणार आहेत. मुंबई फेडरेशनचे उपाध्यक्ष शामराव काकडे यांच्या निवासस्थानी शरद पवार थोड्याच वेळात भेट देणार आहेत.
माजी खासदार संभाजी काकडे यांच्या पत्नी कंठावती यांचे नुकतेच निधन झाल्यानंतर पवार हे त्यांच्या सांत्वन भेटीसाठी जाणार आहेत. पवार काकडे हा संघर्ष सर्वांना न्यात आहे.
जवळपास 55 वर्षांनी शरद पवार हे काकडे यांच्या भेटीला येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील पाच वर्षापासून काकडे कुटुंबीयांची जुळवून घेत शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांचे सुपुत्र अभिजीत काकडे यांना सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर संधी दिली आहे. पवारांच्या विरोधात काकडे यांनी अनेक वेळा खासदारकी आणि आमदारकी लढवली होती. राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झाल्यानंतर आता तब्बल 55 वर्षानंतर शरद पवार हे काकडे कुटुंब यांना भेटण्यासाठी येत आहेत.
हेही वाचा

Pune : रमजान ईद उत्साहात; शुभेच्छांसाठी राजकीय पक्षांची चढाओढ
अम्बरमध्ये अडकलेली 10 कोटी वर्षांपूर्वीची पट्टकृमी
मोदी यांच्या करिष्म्यामुळे आघाड्यांचे युग संपुष्टात

Latest Marathi News तब्बल ५५ वर्षानंतर शरद पवार जाणार काकडे कुटुंबाच्या भेटीला.. Brought to You By : Bharat Live News Media.