रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी NIA ने पश्चिम बंगालमधून दोघांना घेतले ताब्यात

Bharat Live News Media ऑनलाईन : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बंगळूर येथील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी पश्चिम बंगालमधून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजीब अशी त्या संशयितांची नावे आहेत. बंगळूरच्या ब्रुकफिल्ड येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या आयईडी स्फोटात किमान १० जण जखमी झाले होते. (Bengaluru Rameshwaram Cafe blast case)
रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील फरारी संशयित अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजेब यांना कोलकाता जवळील त्यांच्या लपण्याच्या ठिकाणावरून पकडण्यात आले. मुसावीर हुसेन शाजीब याने कॅफेमध्ये आयईडी ठेवला होता आणि अब्दुल मतीन ताहा या बॉम्बस्फोटामागील मास्टरमाईंड होता, असे NIA ने म्हटले आहे.
एनआयएने पुढे सांगितले की, दोघे खोटी ओळख दाखवून लपले होते. एनआयएने पुढे निवेदनात म्हटले आहे की, संशयित आरोपींना केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि पश्चिम बंगाल, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळमधील पोलिसांच्या समन्वयित कारवाईत पकडण्यात आले.
२९ मार्च रोजी एनआयएने दोन संशयित आरोपींची छायाचित्रे आणि तपशील प्रसिद्ध केले होते. या प्रकरणातील संशयिताची माहिती देण्यासाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
गेल्या महिन्यात, NIA ने मुख्य आरोपीला रसद पुरवल्याचा आरोप असलेल्या चिक्कमंगळूर येथील रहिवासी असलेल्या मुझम्मिल शरीफला अटक केली होती.
The absconders in the Rameswaram Cafe blast case, Adbul Matheen Taha and Mussavir Hussain Shazeb were traced out to their hideout near Kolkata and were apprehended by the NIA team.
Mussavir Hussain Shazib is the accused who placed the IED at the Café and Abdul Matheen Taha is… pic.twitter.com/gZ3odYGq7N
— ANI (@ANI) April 12, 2024
हे ही वाचा :
रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे
इडली खाल्ली अन् बॅग ठेवून गेला; रामेश्वरम कॅफे स्फोटाचे फुटेज समोर
Latest Marathi News रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी NIA ने पश्चिम बंगालमधून दोघांना घेतले ताब्यात Brought to You By : Bharat Live News Media.
