राजकीय पक्षांचे युद्ध आता आकाशात!

  देशातील लोकसभा निवडणुकांच्या दुसर्‍या टप्प्याला प्रारंभ होतानाच राजकीय पक्षांवरील लढाई आता आकाशात पोहोचली आहे. निवडणुकीच्या प्रचाराकरिता मैदान गाजविण्यासाठी अधिकाधिक सभा घेता याव्यात, याकरिता राजकीय पक्ष खासगी हेलिकॉप्टर्स भाडे तत्त्वावर घेण्यास प्राधान्य देतात. परंतु, निवडणुकांचे रणशिंग फुंकण्यापूर्वीच काही महिने अगोदर राजकीय पक्षांनी हेलिकॉप्टर्सचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग केल्यामुळे भारतात भाडेतत्त्वावर हेलिकॉप्टर्स देणार्‍या कंपन्यांनी हाऊसफुल्लचे बोर्ड लावले आहेत. … The post राजकीय पक्षांचे युद्ध आता आकाशात! appeared first on पुढारी.

राजकीय पक्षांचे युद्ध आता आकाशात!

राजेंद्र जोशी

 
देशातील लोकसभा निवडणुकांच्या दुसर्‍या टप्प्याला प्रारंभ होतानाच राजकीय पक्षांवरील लढाई आता आकाशात पोहोचली आहे. निवडणुकीच्या प्रचाराकरिता मैदान गाजविण्यासाठी अधिकाधिक सभा घेता याव्यात, याकरिता राजकीय पक्ष खासगी हेलिकॉप्टर्स भाडे तत्त्वावर घेण्यास प्राधान्य देतात. परंतु, निवडणुकांचे रणशिंग फुंकण्यापूर्वीच काही महिने अगोदर राजकीय पक्षांनी हेलिकॉप्टर्सचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग केल्यामुळे भारतात भाडेतत्त्वावर हेलिकॉप्टर्स देणार्‍या कंपन्यांनी हाऊसफुल्लचे बोर्ड लावले आहेत. या आगाऊ मागणीमुळे यंदा हेलिकॉप्टर्सच्या भाड्यातही सुमारे 20 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली असून, अधिक पैसे मोजूनही हेलिकॉप्टर्स उपलब्ध होत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
भारतामध्ये हेलिकॉप्टर्स उद्योगामध्ये ‘पवन हंस,’ ‘ग्लोबल स्पेक्ट्रा, ’ ‘हेलिगो चार्टर्स’ आणि ‘हेरिटेज एव्हिएशन’ हे चार मोठे खेळाडू समजले जातात. देशामध्ये अमेरिकेच्या 15 हजार हेलिकॉप्टर्सच्या तुलनेत भारतीय हेलिकॉप्टर्स उद्योगामध्ये एकूण 254 हेलिकॉप्टर्स आहेत. यातील 190 हेलिकॉप्टर्स ही संरक्षण दलाच्या ताब्यात आहेत, तर उर्वरित 60 ते 70 हेलिकॉप्टर्स खासगी उद्योगांकडे आहेत. या हेलिकॉप्टर्स सेवेसाठी सहा महिन्यांपूर्वी उद्योगांमार्फत सिंगल व डबल सिलिंडर इंजिन असलेल्या हेल्कॉप्टर्सकरिता प्रतिमिनिट अनुक्रमे 14 व 24 डॉलर्स इतका दर आकारला जात होता. देशात लोकसभा निवडणुकीचे नगारे वाजण्याची चाहूल लागताच या उद्योगामध्ये आता हे दर अनुक्रमे 18 व 32 डॉलर्स (सरासरी 1 हजार 500 व 2 हजार 700 रुपये) इतके आकारले जात आहेत.
भारतामध्ये निवडणुका नसल्या, की या हेलिकॉप्टर्सचा एकूण वापर प्रतिमहिना 40 तास इतका होतो, तर तो निवडणूक काळामध्ये प्रतिमहिना 80 ते 90 तास इतका आरक्षित झाला आहे. या आरक्षणामध्ये सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आघाडीवर आहेत. काही महिन्यांपूर्वीच निवडणुकांची गरज लक्षात घेऊन या दोन पक्षांनी हेलिकॉप्टर्स आरक्षित केली. परिणामी, देशातील प्रादेशिक पक्षांना आता हेलिकॉप्टर्स मिळणे अशक्य आहे. यामुळेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी तक्रार नोंदविली होती.
हेलिकॉप्टर्सच्या आरक्षणामध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वप्रथम आरक्षण करून अन्य पक्षांची कोंडी केली. आता राजकीय पक्षांचा मोर्चा चार्टर्ड विमानांकडे वळला आहे. तेथे दर स्थिर आहेत. परंतु, ही स्पर्धा सुरू झाली, की चार्टर्ड विमानांचे दरही भडकू शकतात. मुळातच भारतात टाटा उद्योग समूहाच्या विस्तारा या हवाई सेवेत खंड पडू लागल्याने भारतीय विमान कंपन्यांनी आपल्या हवाई प्रवासाच्या तिकिटाचे दर 15 ते 20 टक्क्यांनी वाढविले आहेत. उद्या राजकीय पक्षांनी या विमानसेवेत आपले आरक्षण करणे सुरू केले, तर त्याचाही दरवाढीवर परिणाम होऊ शकतो.
The post राजकीय पक्षांचे युद्ध आता आकाशात! appeared first on Bharat Live News Media.

Go to Source