फक्त टाईप करताच ‘गुगल’ तयार करणार व्हिडीओ

वॉशिंग्टन : सध्या तंत्रज्ञान ‘दिन दुनी रात चौगुनी’ अशा वेगाने प्रगती करीत आहे. सध्याचे युग तर ‘एआय’ म्हणजेच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चे आहे. ‘एआय’चा सर्रास वापर होणार्या या तंत्रज्ञानाच्या जगतात ‘ओपन एआय’ आणि ‘गुगल’ Google कमालीचे योगदान देताना दिसत आहे. यातही यांच्या स्पर्धेमध्ये आता ‘गुगल’ बाजी मारताना दिसत आहे. कारण ठरतेय ते म्हणजे गुगलचे ’गुगल विडस्’ हे नवे टूल.
नोकरीच्या ठिकाणी एखादा व्हिडीओ बनवण्यासाठी गुगलचे Google हे अॅप बेस्ड टूल बरीच मदत करणार आहे. इथे तुम्ही ‘गुगल’चे तयार टॅम्पलेट पाहू आणि वापरू शकता किंवा स्वत: शाब्दिक स्वरूपात कमांड देऊन अर्थात टेक्स्ट लिहून त्याचा व्हिडीओ बनवू शकता. व्हिडीओ तयार झाल्यानंतर यावर तुम्ही मनाजोगा इफेक्टही जोडू शकता. इतकेच नव्हे, तर तो हवा तसा एडिट करू शकता. या व्हिडीओमध्ये तुम्ही स्वत:चा आवाज देण्याचेही फिचर आहे किंवा ‘गुगल’कडे असणारे इतर आवाजही तुम्ही त्यात वापरू शकता.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने गुगल Google विडस् तुम्हाला व्हिडीओ बनवण्यासाठी मोठी मदत करणार आहे, जिथे सर्वप्रथम एक स्टोरीबोर्ड तयार केले जाते. स्टोरीबोर्डमध्ये बदल करून तुम्ही तुमच्या आवडीची शैली निवडू शकता. यानंतर हे अॅप तुम्हाला त्यांच्याकडे असणारे व्हिडीओ आणि पार्श्वसंगीत वापरून व्हिडीओ ड्राफ्ट तयार करून देईल. वापरण्यासाठी अतिशय सोपे असणारे हे अॅप इतके कमाल आहे की, त्यावर तुम्ही एका ब्राऊजरमधून दुसर्या ब्राऊजरमध्येही काम करू शकता, प्रोजेक्टही शेअर करू शकता. प्राथमिक माहितीनुसार गुगलचे हे टूल जून महिन्यात लाँच करण्यात येणार आहे.
Latest Marathi News फक्त टाईप करताच ‘गुगल’ तयार करणार व्हिडीओ Brought to You By : Bharat Live News Media.
